भाग – २४
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
शाक्त धर्म पद्धतीत झालेल्या दुसऱ्या राज्यभिषेका नंतर स्वराज्याचा
विस्तार दक्षिणेत करावा असा विचार शिवरायांनी केला.त्यांच्या इच्छेनुसार
संभाजीराजे यांनी गोवा व तळकोकणावर स्वारी केली.त्यानंतर शिवरायांनी दक्षिण
दिग्विजयाची मोहीम आखली.या मोहिमेत मोगलांच्या विरोधात एकजूट करायची असे
त्यानी ठरविले होते.शत्रुणा मित्र बनवायचे व मित्रा
बरोबर स्नेह बंध करायचे असा त्यांचा उद्देश होता.शहाजीराजे व त्यांचा मोठा
भाऊ संभाजी यांनी निर्माण केलेल्या राज्याशी आणि सावत्र बंधू व्यंकोजी
यांच्याशी स्नेहबंध घट्ट करायचे असा त्यांनी मनोदय ठरविला होता.सदरच्या
मोहिमेत संभाजीराजे यांना बरोबर नेण्याचे गरजेचे होते...परंतु वैदिक धर्म
पंडितांनी रायगडावरचे वातारवण दुषित केले होते...त्यामुळे दोघांनीही
स्वराज्य सोडून जाणे धोक्याचे होते.संभाजीराजे रायगडावर थांबल्यास या वैदिक
धर्मीय पाताळ यंत्र्याकडून त्यांना दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत
नाहती...त्यामुळे शिवाराय – सोयराबाई – संभाजीराजे यांच्यात गुप्त मसलत
झाली.रायगडाची जबाबदारी सोयराबाई यांचेवर सोपविण्यात आली...आणि संभाजीराजे
यांनी शृंगारपुरास जाऊन कवी कलश आणि केशव पंडित यांचे बरोबर राहून
विधाभ्यास करून वेळोवेळी रायगडाची खबरबात घेत राहावी असा गुप्त सल्ला
देण्यात आला .....आणि छत्रपती शिवराय आपल्या विश्वासू सहकार्य बरोबर एकटेच
दक्षिणेकडे निघाले....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती
संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ५९ वर “गुप्त
सल्ला” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि
छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment