भाग – १३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती संभाजीराजे यांची दुधआई (धारव माता) कापूरहोळ येथील गाडे पाटील
यांची सून होती.त्या काळचे गाडे पाटील जर आज मराठा असेल तर त्यात गैर काय
आहे....? असा माझा स्पष्ट प्रश्न आहे.संभाजींच्या जन्मानंतर त्यांची माता
सईबाई खूप आजारी पडल्या होत्या.जन्मलेल्या बाळाला आईच्या दुधाची खूप गरज
होती.संभाजीराजे बाळ असल्यामुळे त्यांना दुधाची
खूप आवश्यकता होती.त्यासाठी माता जिजाऊ यांनी कापूरहोळचे गाडे पाटील यांची
ओली बाळातीण सून यांची शंभूबाळ यांची दुधआई (धारव माता) म्हणून नेमणूक
केली होती.ती दलित असल्यामुळे तिचे दूध कुसंस्कार करणारे असल्याचे वैदिक
धर्म पंडितांच्या सनातनी व्यावस्थेचे म्हणणे होते.अशा जातीय वर्ण
व्यावस्थेला झुगारून त्यांनी त्या धारव माताच्या दुधावर संभाजीराजे यांना
मोठे केले.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची
संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक २५ वर “दुध आई” या मथळ्याखाली
लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment