Wednesday, 25 October 2017

भाग – ४१ संभाजीराजांची हत्या……..एक षडयंत्र......! लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
संभाजीराजांची हत्या……..एक षडयंत्र......!
स्वराज्यातील वीर मराठा सरदार संताजी घोरपडे पळून जाण्यास यशस्वी....!
कोकण येथील संगमेश्वर ते दौंड येथील बहादूरगड असा जेरबंद संभाजीराजे यांचा प्रवास सुरु....!
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
कोकणातील संगमेश्वर येथे असणारे संभाजीराजांना चुकीची खबर मिळाली होती की,चारशे ते पाचशे मोगल सैनिक आले आहेत...परंतु ते अडीच हजार मोगल सैनिक होते.त्यांचे बरोबर असणारा सरदार संताजी घोरपडे आणि खंडोजी बल्लाळ पळून गेले.मोगल सैनिकांनी पूर्ण घेराव संभाजीराजांना घातला होता.मूकर्बखान याचा मुलगा इखलासखान याने संभाजीराजांना साखळदंड घालून अखेर जेरबंद केले.संभाजीराजे निसटून जाऊ नये याची पूर्ण खबरदारी मूकर्बखान याने केली होती.संभाजीराजे यांना जेरबंद केल्याची बातमी अकलूज येथे तळ ठोकून बसलेल्या औरंगाजेब याला देण्यात आली होती.त्याने आपली छावणी दौंड येथील बहादूरगडाकडे हलविली आणि संभाजीराजांना तिकडे घेऊन येण्यास सांगितले. मूकर्बखान याचे बरोबर वाटाडे असणारे धर्म पंडित अत्यंत आनंदित झाले होते. जेरबंद केलेले संभाजीराजे यांचा अत्याचाराचा प्रवास सुरु झाला...असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ११० वर “जेरबंद” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत


No comments:

Post a Comment