Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २२

भाग – २२
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
२४ सप्टेंबर १६७४ मध्ये दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत करून समतापर्वाची सुरुवात केली.
.”ब्राह्मण म्हणून कोण मुलाहीजा करतो”

पहिला राज्यभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवराय व्यथित झाले....त्यातच वैदिक धर्म पंडित मोरोपंत नावाच्या बामनाने छत्रपती शिवरायांना असे उच्चारले की,तुम्हा शुद्र मराठ्यांच्या हाताखाली ब्राह्मणांनी कसे काम करायचे...! हा प्रश्न महाराजांच्या काळजात घुसून सल करू लागला....अफजलखानाच्या वधाच्या वेळी कृष्णा भास्कर कुलकर्णी याने जो स्वराज्यावर हल्ला केला त्याची आठवण शिवरायांना यावेळी झाली...ही बाब माता जिजाऊ यांना कळाली त्यांनाही दु:ख झाले....त्यांनी वैदिक धर्म पंडित यांना झुगारून टाकाण्याचे मार्गदर्शन शिवरायांना केले.माता जिजाऊ यांच्या आज्ञानुसार शिवरायांनी शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्यभिषेक करण्याचे ठरविले.माता जिजाऊ यांचे दुख:द निधन झाले.येसूबाई या पिलाजी शिर्के यांच्या कन्या होत्या ते शाक्त धर्माचे अनुयायी होते....त्यांनी येसूबाई सोबत केशव पंडित व रघुनाथ पंडित असे शाक्त पंडित दिले होते...संभाजीराजे शाक्त धर्माचे अनुयायी झाले होते.शाक्त धर्म हा स्त्रीप्रधान – वर्ण -जात – स्त्रीदास्य नाकारणारा समतावादी धर्म होता...आणि वैदिक धर्म पंडितांचा सनातनी हा अनिष्ट रूढी – कर्मकांड – विषमतावादी मानवतेच्या प्रगतीचा अडसर होता.शिवरायांनी दुसरा राज्यभिषेक करण्यासाठी २४ सप्टेंबर हा दिवस निवडला होता...वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्मा नुसार त्यांच्या तिथी नुसार पितृ पंधरवडा सुरु होता.त्यादिवशी पितृ पंधरवड्यातील नववा दिवस म्हणजे आह्यवोनवमीचा दिवस होता.या दिवशी सनातनी धर्मानुसार विधवा मातांचे पितर घालतात.सध्याचे मराठा या दिवसात म्हणजे पितृ पंधरवड्यात कोणताही व्यवहार करीत नाहीत...अशा दिवशी शिवरायांनी २४ सप्टेंबर १६७४ साली शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्यभिषेक करून वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्माला झुगारुन...पहिला राज्यभिषेक नाकारून हादरा दिला....आणि समतापर्वाची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली.शाक्त धर्म पद्धतीतील दुसरा राज्यभिषेक करण्यासाठी शिवरायांना मोलाची साथ ही संभाजीराजे आणि त्यांची पत्नी येसूबाई यांनी दिले.तसेच त्यांच्या बरोबर कवी कलश,केशव पंडित आणि रघुनाथ पंडित यांनी साह्य केले.१९ जानेवारी १६७५ मध्ये प्रभावशाली ब्राह्मण सुभेदाराला असे सुनावले की.”ब्राह्मण म्हणून कोण मुलाहीजा करतो”.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ५६ वर “ही समतापर्वाची सुरुवात” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

No comments:

Post a Comment