लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
नेताजी पालकर यांना स्वधर्मात घेऊन सनातनी व्यावस्थेला हादरा दिला.....!
स्वराज्यातील पहिला मावळा सरसेनापती वीर बाजी पासलकर आहेत....आणि नेताजी
पालकर दुसरा क्रमांकाचा मावळा म्हटले तर वावगे ठरणार नाही.शिवरायांच्या
बालपणापासून हे दोघेही त्यांचे बरोबर होते...शिवरायांना युद्धाभ्यास
शिकविण्यास हे दोघेही अग्रेसर होते.स्वराज्याच्या पायाभरणीमध्ये या दोघांचा
मोलाचा वाटा आहे.छत्रपती शिवरायांनी शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्यभिषेक
केला त्यावेळेस सरसेनापती वीर बाजी पासलकर त्यांच्या बरोबर होते. नेताजी
पालकर यांनी मुस्लीम धर्म स्विकारलेला होता असे काही इतिहासकार यांचे
म्हणणे आहे.छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजयास निघाले होते.,,,तेव्हा
त्यांनी नेताजी पालकर यांना स्वधर्मात घेतले तेव्हा सनातनी धर्म
व्यावस्थेला याचा मोठा हादरा बसला.यावरून असे दिसते की,वैदिक धर्म
पंडितांचा सनातनी धर्म आणि छत्रपती शिवराय – सरसेनापती वीर बाजी पासलकर –
नेताजी पालकर हे शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.....असे लेखक चंद्रशेखर शिखरे
लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ६०
वर “गदक्षिण दिग्विजय” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी
महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द
धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment