Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३३

भाग – ३३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
वैदिक धर्म पंडित आपला सनातनी हिंदू धर्म प्रस्थापित करण्यासठी काहीही करू शकतात.
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
वैदिक धर्म पंडितांनी अकबराला लिहिलेले जहरीपत्र छत्रपती संभाजी महाराजांना मिळाले होते.महाराजांनी स्वराज्याच्या गद्दारांची धरपकड करण्याचे आदेश दिले.त्यांना अटक करून पाली - सुधारगडला अकबराकडे नेण्यात आले.त्याचे समोर उभे समोरा समोर करून कटाची खातरजमा करून त्यांना कैदेत टाकण्यात आले.या कटात सामील असलेला शामजी नाईक याला हरजीराजेंनी कर्नाटकात कैद केले.कटाचा म्होरक्या आण्णाजी दत्तो,बाळाजी आवजी,हिरोजी फर्जंद सोमाजी दत्तो यांना ६ सप्टेंबर १६८१ रोजी हत्तीच्या पायी देऊन मृत्यू दंडाची शिक्षा देऊन काहीना सुळावर चढविले...तर काहीना कडेलोट करण्याची शिक्षा देऊन वैदिक धर्म पंडितांना शिक्षा देणारे पहिले छत्रपती संभाजी महारज आहेत.समतावादी शाक्त धर्मीय संभाजी महाराज यांनी वैदिक धर्म पंडितांना दिलेल्या शिक्षेमुळे बाकीचे वैदिक धर्म पंडित अस्वस्थ झाले.....यावरून असे दिसते की,छत्रपती संभाजी महाराज हिंधू धर्मीय असते...तर हिंदू धर्म पंडितांना अशा प्रकारे शिक्षा त्यांनी दिली नसती.....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ८० वर “विषवल्ली चिरडली” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.




No comments:

Post a Comment