Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २८

भाग – २८
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
कटाचे सूत्रधार वेदिक धर्म पंडित आण्णाजी दत्तो आहेत.....!
.(मंचकारोहण स्वत: सोयराबाईनी राजारामाचे केलेले आहे.कोणताही वैदिक धर्म पंडित न घेता स्त्रीला मंचकारोहण करण्याचा अधिकार सनातन धर्मात आहे काय....?)
बळीराजा—महावीर—बुध्द—सम्राट अशोक यांचा वंशज छत्रपती शिवाजी महाराज कालकथित झालानंतर त्यांचे निर्वाण झाल्यानंतर रायगडावर प्रल्हाद निराजी – कारस्थानी राहुजी सोमनाथ आणि चिटणीस बालाजी आवजी हवालदार हिरोजी फर्जंद हेच प्रमुख कारभारी होते.राहुजीने तात्काळ निरोप पाठवून आण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांना बोलावून घेतले.सर्व कारस्थाण्यानी मसलत केली....युवराज संभाजीराजे जर राजसिहासनावर आरूढ झाला तर आपले काही खरे नाही.त्यांनी नऊ वर्षाच्या राजारामला गादीवर बसविण्याचे ठरविले...राजाराम अल्पवयीन असल्या कारणाने आपल्याला मनमानी कारभार करणे सोयीचे होईल असे वैदिक धर्म पंडितांना वाटत होते....राजारामाचा राज्यभिषेक करण्यास सोयराबाई यांनी विरोध केला....तेव्हा हे वैदिक धर्म पंडित सोयराबाई यांना म्हणाले की,तुम्ही आमचे ऐकले नाहीतर शिवरायांना विषप्रयोग करून तुम्हीच हत्या केली अशी बातमी सर्वत्र पसरवून तुमची बदनामी करू अशी धमकी देऊन नऊ वर्षाच्या राजारामाचे मंचकारोहण करण्यात आले....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ६९ वर “राजारामाचे मंचकारोहन” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत


No comments:

Post a Comment