Thursday, 26 October 2017

भाग – ४७ लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....? संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!

भाग – ४७
लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....?
संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!
छत्रपती संभाजी महाराज यांना अखेरची मानवंदना....शूर वीर ऐतिहासिक पुरुष महार समाजाचीच...!
दि.११ मार्च १६८९ रोजी संभाजीराजांची हत्या केल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वढू बुद्रुक गावच्या माळरानावर फेकण्यात आले.जे कोणी या प्रेतला अग्नी देतील त्यांनाही ठार मारले जाईल.अशी दवंडी पिटविण्यात आली.तेथील महार समाजातील गायकवाड कुटुंबाला आपल्या लाडक्या राजाची विटंबना सहन झाली नाही.त्यानी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून ते शिवून आपल्या वस्ती जवळ छत्रपती संभाजी महाराज यांचेवर अंत्यसंस्कार केले.शाक्त धर्म स्वीकारून स्त्रीमुक्ती आणि जातीअंतासाठी संघर्ष करणाऱ्या व त्यासाठी हुतात्म पत्करणाऱ्या शंभूराजाच्या मृतदेहाचे तुकडे स्त्रीयांनी शिवून त्यांचा अंत्यविधी करून या समतावादी योद्ध्याला अखेरची मानवंदना दिली...आणि त्याठिकाणी संभाजीराजांची समाधी बांधून आजही त्याची निगा ते राखीत होते...परंतु आज त्याठीकाणी आरएसएसचे हेगडेवार यांचा मोठा फोटो उभारून त्याठिकाणी सनातनी हिंदू धर्मियांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा विपर्यास करून त्यांचे समतावादी कर्तुत्व संपविण्याचा घाट घातला जात आहे.....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक १२४ वर “अखेरची मानवंदना” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत

1 comment:

  1. Coin Casino Review 2021 | Play at an Online Casino
    Check our in-depth Coin 온카지노 Casino review to learn all about the site and how to win a real money playing 제왕카지노 at an online casino. Rating: 4.7 인카지노 · ‎Review by CasinoWow

    ReplyDelete