भाग – ४४
लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....?
संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!
संभाजीराजांची हत्या ११ मार्च १६८९ मध्ये तुळापुर येथे करून....१२ मार्च १६८९ मध्ये पेशवाईची पायाभरणी करण्यात आली.....?
३८ दिवसांच्या प्रवासात स्वराज्यातील वीर मराठा सरदार होते कोठे.....?
जिजाऊ प्रकाशन
जेरबंद संभाजीराजांना बहादूर गडावरून ३ मार्च १६८९ रोजी भीमा कोरेगाव येथे
आणण्यात आले.वैदिक धर्म पंडितांनी मनुस्मृती नुसार सांगितलेल्या
शिक्षेप्रमाणे संभाजीराजांची जीभा छाटण्यात आली.मनुस्मृती नुसार डोळे
फोडण्यात आले.....त्याच अवस्थेत इंद्रायणी-भिमा-भामा नदीच्या तीरावर ज्या
गावातून आणले..ज्या गावात त्यांच्यावर फुले उधळली गेली त्या गावाचे नाव आज
“फुलगाव” पडले आहे.ज्या गावात त्यांना आपटी दिली त्या गावाचे नाव आज “आपटी”
म्हणून उदयास आले आहे.....आणि ज्या गावात त्यांना वडाच्या झाडाला मरगळ
येईपर्यंत बांधण्यात आले....त्या गावचे नाव आज “मरकळ” पडले आहे.शहाजीराजे
यांनी ज्या गावामध्ये नदीच्या किनारी घाट बांधला.दुष्काळाच्या काळात
हत्तीची तुळा त्याच घाटावर करून हत्तीच्या वजना एवढे सोनी चांदी देऊन त्या
दुष्काळग्रस्त गावांना मदत केली.ज्या गावात तुळा झाली त्या गावाला आज
“तुळापुर” म्हटले जाते....आणि त्याच गावात शहाजीराजे यांनी “स्वराज्य”
संकल्पित केले.....त्याच तुळापुर गावात संभाजीराजांच्या शरीराचे ११ मार्च
१६८९ रोजी तुकडे तुकडे करून.....हत्या करून मनुस्मृतीचे शिक्षेची अमलबजावणी
करून छत्रपती संभाजीराजांचे शिर भाल्यावर लटकून इंद्रायणी-भिमा-भामा
नदीच्या मधोमध शिर लावलेला भाला वाळू मध्ये रोऊन ११ मार्च १६८९ रोजी
स्वराज्याचा पाडाव करून...पेशवाईची पायाभरणी करण्यात आली.कोकण येथील
संगमेश्वर गाव ते बहादूरगड...आणि बहादूरगड ते तुळापुर असा ७०० मैलांचा
प्रवास जेरबंद छत्रपती संभाजीराजांचा सुरु होता.संगमेश्वर येथून पळून
गेलेला मराठा सरदार संताजी घोरपडे ३८ दिवस काय करत होता...आणि
संभाजीराजांची धिंड संपूर्ण स्वराज्यातून काढण्यात आली...त्या स्वराज्यातील
वीर मराठा सरदार काय करत होते....त्यानी संभाजीराजांना वाचविण्यासाठी
प्रयत्न का केले नाही....? इतिहासात संभाजीराजांना सोडविण्यासाठी एकही
बलिदान का गेले नाही....? इंद्रायणी-भिमा-भामा नदीच्या पंचकृशीतील मराठा
सरदार काय करीत होते...? असा प्रश्न लेखकाला पडला असल्यामुळे....यावरून असे
स्पष्ट होते की,छत्रपती संभाजीराजे हिंदू नव्हते....असे लेखक चंद्रशेखर
शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान
क्रमांक ११८ आणि ११९ वर “अमानुष अमानवी शिक्षा” या मथळ्याखाली लिहिले आहे.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे
नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment