Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३४

भाग – ३४
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई या शाक्त धर्माचे अनुयायी होते...त्यामुळे वैदिक सनातनी धर्माचा त्यांचा काही एक संबध नाही....!
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्मानुसार पुरुषप्रधान व्यावस्थेला महत्व होते.भारतीय निवासी मातृसत्ताक स्त्रीप्रधान संस्कृतीला महत्व देत होते.त्यामुळे याठिकाणी आर्य सनातन धर्म व्यावस्था ही भारतीय नव्हती...त्यांचा मूळ ध्वज हा काळा आणि स्वतिक चिन्ह असलेला होता.भारतीय निवासी हा असुरवंशीय बळीराजा - बुध्द – सम्राट अशोक – शहाजी राजे यांच्या भगवा ध्वजाला मानणारा होता.अलमगीर प्रचंड फौज घेऊन स्वराज्याच्या उमराठ्यावर उभा होता.या सर्व रणधुमाळीत मुलकी प्रशासनाकडे बारकाईने लक्ष असणे गरजेचे होते.त्यांनी महाराणी येसूबाईकडे मुलकी प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी देऊन त्यांच्या नावाचा “श्रीसखी राज्ञी जयति” हा राजमुद्रेचा स्वतंत्र शिक्का त्यांना देण्यात आला.मध्यमयुगीन त्या काळात ही क्रांतीकारी घटना होती...कारण वैदिक धर्म पंडितांनी स्त्रीला शुद्र ठरविले होते.परंतु छत्रपती संभाजी महाराज समतावादी – वर्ण जात – स्त्रीदास्य नाकारणाऱ्या धर्माचे अनुयायी होते.महाराणी येसूबाई सुविद्य,सुसंस्कृत व युध्दकुशल आणि शाक्त धर्माच्या अनुयायी होत्या... असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ८४ वर “श्रीसखी राज्ञी जयति” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


No comments:

Post a Comment