Wednesday, 25 October 2017

भाग – ४२ संभाजीराजांची हत्या एक षडयंत्र......!


भाग – ४२
संभाजीराजांची हत्या एक षडयंत्र......!
कोकण येथील संगमेश्वर ते दौंड येथील बहादूरगड असा जेरबंद संभाजीराजे यांचा प्रवास....!
स्वराज्यातील वीर मराठा सरदार होते कोठे.....?
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
कोकणात संगमेश्वर येथे दिनांक ४ फेब्रुवारी १६८९ रोजी जेरबंद केलेल्या संभाजीराजांना दिनांक १४ फेब्रुवारी १६८९ मध्ये बहादूरगडापासून दोन कोसांवर पर्यंतच्या अंतरावर पोहचले होते.बादशहाला खबर देण्यात आली.बादशहाने आहे तेथेच थांबण्याचा हुकुम देण्यात आला व हमीउद्दीनखानास त्याच्या स्वागत करण्यास पाठवून दिले.बादशाही हुकुमाप्रमाणे संभाजीराजांच्या अंगावर ‘तक्ता कुलाह’ म्हणजे इराण मध्ये गुन्हेगारांना घालतात तसा पोशाख व उंच लाकडी टोपी चढविण्यात आली.त्यांना मरतुकड्या उंटावर उलटे बसविण्यात येऊन ढोल बडवीत कर्णे व शिंगे वाजवीत अपनास्पद रीतीने फजिती करीत त्यांची धिंड काढण्यात आली.दोन्ही बाजूने मोगली छावणी होती.मोगली सरदारांनी व सैनिकांनी संभाजीराजे यांना पाहण्यासाठी दोन्ही बाजुमे गर्दी केली होती....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक १११ वर “धिंड” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

No comments:

Post a Comment