भाग – ४५
लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....?
संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!
संभाजीराजांची हत्या ११ मार्च १६८९ मध्ये तुळापुर येथे करून....१२ मार्च १६८९ मध्ये पेशवाईची पायाभरणी करण्यात आली.....?
घरावर उंच उंच गुढी उभारून...गुढीपाडवा पाडवा साजरी करून...स्वराज्याचा पाडाव दिवस साजरा करू नका....!
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
जिजाऊ प्रकाशन
संभाजीराजांचा मृत्यू नंतरचा दुसरा दिवस,१२ मार्च १६८९,चैत्र शुध्द
प्रतिपदा शके १६११,पंचांगाचा पहिला दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच
गुढीपाडवा...! आजूबाजूच्या परिसरात शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली
होती,संपूर्ण रयत प्रचंड दु:खात होती.वैदिक धर्म पंडितांच्या मनाप्रमाणे
मनुस्मृतीचा म्हणजे मनूचा विजय झाला होता.या विजयाची विजयगाथा म्हणून
त्यांनी संभाजीराजांचे मस्तक भालाच्या टोकावर अडकवून मिरविण्यात आले.विकृत
सनातनी वैदिक धर्म पंडित आनंदित होता.कारण त्यांच्या दुष्टीने संभाजी
धर्मद्रोही होता.शुद्र असून त्याने वेद वाचले होते.त्याने चातुर्वण्यवर
आधारित विषमतावादी वैदिक ब्राह्मणी धर्म नाकरून समतावादी शाक्त धर्म
स्वीकारला होता.त्याने आपल्या पित्याचा शाक्त राज्यभिषेक करून पूर्वीचा
वैदिक राज्यभिषेक बाद ठरविला होता.वैदिक धर्माची स्त्रीयांना शुद्र
ठरविणारी धर्माज्ञा नाकरून येसू बाईला राज्य कारभार सोपविणे हा देखील
त्याचा अपराध होता.स्वराज्यद्रोही ब्राह्मण मंत्र्यांना मारून त्याहे
ब्रह्महत्येचा सर्वात मोठा घोर अपराध केला होता.वैदिक ब्राह्मणी
व्यावस्थेच्या शत्रूचा अंत त्यांच्या मानाजोकता झाला होता.त्यांना पेशवाईची
पायाभरणी झाल्याचा आनंद झाला होता.त्यांनी आपल्या घरावर उंच उंच गुढ्या
उभारल्या.काहींनी साखर वाटली..तर काहींनी पेढे...असे लेखक चंद्रशेखर शिखरे
लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक
१२० वर “पाडवा नंतरचा पाडवा” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती
शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द
धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment