Wednesday, 25 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३९

भाग – ३९
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
“मुकर्रबखान” याने संगमेश्वर मध्ये प्रवेश करताच आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या पहिल्या चार-पाचशे तुकड्याचे नेतृत्व त्याने त्याचा मुलगा इसलासखान यांचेकडे दिले.आणि त्याच्याच पाठोपाठ दोन हजार सैन्याचे तो नेतृत्व करीत होता.याची खबर संभाजीराजांना लागली तेव्हा ते देसाई वाड्यात होते.तेव्हा त्यांनी म्हालोजी भोसले व कवी कलश यांचे बरोबर चर्चा केली.संभाजीराजे यांनी रायगडाला जावे.आणि भोसले कलश येणाऱ्या सैन्य बरोबर लढणार असे ठरले...परंतु संभाजीराजांना धोका पत्करायचा नव्हता त्यांना शत्रू चार पाचे सैन्य घेऊन आला आहे अशी खबर मिळाली होती.आपल्याकडेही चार पाचशे सैनिक आहेत त्यामुळे म्हालोजी भोसले आणि कवी कलश यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हते.तेव्हा त्यांनी लढायचा निर्णय घेतला.त्यांना चुकीची खबर मिळाली होती इतके भयानक षडयंत्राची चाहूल संभाजीराजांना
झाली नव्हती...मग नेमके वैदिक धर्म पंडितांनी असे कोणते षड्यंत्र आखून ठेवले होते.आणि संभाजीराजे जर हिंदू धर्मीय होते तर हे षड्यंत्र कशासाठी....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक १०४ वर “खबर लागली” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


No comments:

Post a Comment