Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३२

भाग – ३२
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
वैदिक धर्म पंडित आपला सनातनी हिंदू धर्म प्रस्थापित करण्यासठी काहीही करू शकतात.
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
स्वराज्य कसे संपेल याची काळजी वैदिक धर्म पंडित घेत होते....कारण स्वराज्य संपले की.आपला सनातनी हिंदू धर्म प्रस्थापित करता येईल असे त्यांना माहित होते.अफजलखान हा शिवरायांवर चालून आला होता.शिवरायांना जिंदा पकडण्यासाठी तो आला होता....मात्र वाईच्या ३५० वैदिक धर्म पंडितांनी सभा बोलावून शिवरायांना मुर्दा पकडण्यासाठी त्याच्याकडे विनंती करून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.त्यावेळेस त्या वैदिक धर्म पंडितांचे नेतृत्व कृष्णा भास्कर कुलकर्णी करीत होता.प्रतापगडाच्या अफजलखान आणि शिवराय यांचे भेटी दरम्यान अफजलखानाने केलेल्या दगबाजीला शिवरायांनी त्याचे पोट फाडून उत्तर दिले होते.अफजलखान धारातीर्थ पडलेला पाहून आपला मनसुबा काही यशस्वी होत नाही असे जेव्हा त्या कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या लक्षात आले...तेव्हा त्याने बेसावध असलेल्या शिवरायांवर प्राणघातक हल्ला केला.स्वराज्यावर वैदिक धर्म पंडितांचा हा पहिला हल्ला होता शिवरायांनी त्या कुलकर्णींला माफ केले...परंतु त्याने पुन्हा हल्ला केला तेव्हा त्या स्वराज्याच्या गद्दाराला शिवरायांनी जिवंत सोडले नाही.ब्राह्मण मारल्याचे दु:ख सर्व वैदिक धर्म पंडितांना झाले होते...मात्र शिवरायां समोर आपण टिकू शकत नाही याची कल्पना त्यांना आली होती.दुखावलेले वैदिक धर्म पंडित शिवरायां सोबत राहून संधीची वाट बघत होते.परंतु युवराज संभाजीची भीती त्यांना होती...त्यांनी विषप्रयोग करून संभाजीना संपविण्याचा प्रयत्न केला होता तोही अयशस्वी झाला.छत्रपती शिवराय जर जिवंत राहिले तर आपला सनातनी धर्म संपवून जाईल.ते संधीची वाट पहात होते युवराज संभाजी पन्हाळगड्याला होते...अखेर त्यांना संधी मिळाली त्यांनी विषप्रयोग करून छत्रपती शिवराय यांची त्यांनी त्यांच्या सनातनी धर्मासाठी हत्या केली.सोयराबाई यांचेवर दबाव टाकून राजारामाला गादीवर बसवून स्वराज्याची राजधानी रायगड ताब्यात घेतला होता.आता फक्त संभाजीराजे राहिले होते त्यांना संपविण्यासाठी वैदिक धर्म पंडित पन्हाळगड्याकडे निघाले होते...परंतु कराड येथे या वैदिक धर्म पंडितांना स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अटक करून बेड्या ठोकून पन्हाळगड्याला नेऊन युवराज संभाजीराजे यांचे समोर उभे केले.त्यांनी केलेल्या कृत्याची चौकशी करण्याकरिता संभाजीराज्यांनी आपले सासरे पिलाजी शिर्के यांना रायगडाचा अधिकारी नेमून आदेश केले.चार वर्ष त्यांना कैदेत ठेऊन रायगडाला येताना त्या कैद्यांना बरोबर घेऊन आले...मात्र त्यातील एक कैदी वैदिक धर्म पंडित मोरोपंत पिंगळे कैदेतच मेले.याचे दु:ख या वैदिक धर्म पंडितांना झाले होते.एक वैदिक धर्म पंडित कृष्णा भास्कर कुलकर्णी शिवराय यांचे हातून मारला गेला....तर दुसरा वैदिक धर्म पंडित मोरोपंत पिंगळे युवराज संभाजीराजे यांचेकडून कैदेत ठेवल्यामुळे मारला गेला.रायगडला आल्यानंतर युवराज संभाजीराजे यांनी शाक्त धर्म पद्धतीत राज्यभिषेक करवून घेऊन आता ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज झाले होते.छत्रपती संभाजी महाराज यांनी या सर्व वैदिक धर्म पंडितांना माफ करून राज्यकारभारात मोठ मोठी पदे देऊन पुन्हा सन्मान दिला.वैदिक धर्म पंडितांना कोणाच्या जीवाची पर्वा नव्हती...त्यांना त्यांचा वैदिक सनातनी धर्म टिकवायचा होता त्यासाठी वाटेल ते करायला तयार होते.पुन्हा ते संधीची वाट बघत होते.....अखेर त्यांना संधी मिळाली त्यांनी छत्रपती संभाजीराजेना जेवणातून विष दिले....मात्र एका प्रामणिक सेवकामुळे त्यांचा तो प्रयत्न फसला.मोगल राजा अकबर स्वराज्यात आला हे पाहून वैदिक धर्म पंडित आण्णाजी दत्तो आणि सोमाजी दत्तो आनंदित झाला होता.हिरोजी फर्जंद नुकताच अकबराला भेटून आला होता.....या तिघांनी अकबराच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजेना संपविण्याचा पुन्हा एकदा कट रचला...त्यांनी अकबराला पत्र लिहिण्याचे ठरविले.या तीनही पाताळयंत्री यांनी अकबराला असे पत्र लिहिले की,संभाजी तुमचा मित्र आहे तुम्ही त्याला जेवायला बोलवा आम्ही विष घातलेले जेवण तुम्हाला देतो ते त्याला गोड बोलून खायला घाला....आणि संभाजीचा मृत्यू झालेवर अर्धे राज्य तुम्हाला देतो आणि अर्धे राज्य आम्ही घेतो.कारण या वेदिक धर्म पंडितांना माहित होते की,जोपर्यंत स्वराज्याचा कारभार आपल्या हातात येणार नाही तो पर्यंत आपला धर्म प्रस्थापित करता येणार नाही...आणि छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांचा समतावादी शाक्त धर्म संपविता येणार नाही.या वैदिक धर्म पंडितांनी लिहिलेले जहरीपत्र अकबराला मिळाले तो हादरून गेला....त्याने ते वाचले आणि आपला सहकारी दुर्गादास राठोड याला दाखविले....त्याने अकबराला छत्रपती संभाजीराजेनी केलेल्या मदतीची आठवण करून दिली.आणि त्याला असा सल्ला दिला की,हे पत्र तू संभाजीराजेना पाठवून तुझ्या प्रामाणिकपणाची जाणीव ठेव. दुर्गादास राठोड याने सांगितल्याप्रमाणे आपल्या खास दुताकडून संभाजीराजेना ते जहरीपत्र पाठवून दिले.यावरून स्पष्ट असे दिसते की,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्य सनातनी हिंदू धर्माचे नव्हते...हिंदू धर्माचा आणि स्वराज्याचा काही एक संबध नव्हता.आपला वैदिक सनातनी धर्म कसा प्रस्थापित होईल याची व्यावूरचना हे वैदिक धर्म पंडित आखीत होते...परंतु त्यांना यश मिळत नव्हते....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ७८ वर “पुन्हा कारस्थान” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

No comments:

Post a Comment