मागील वर्षीचा 359 वा 'मराठा आरमार दिन' अनेक शिवप्रेमींनी फेसबुकवर
नवनवीन पोस्ट टाकून साजरा केला. त्याकरिता अनेक शिवप्रेमींनी अभ्यास करून
शिवरायांचे आरमारविषयक नवीन पैलू उत्तम रितीने आपल्या पोस्टद्वारे मांडले.
अत्यंत कमी कालावधीत सर्वांनी याबाबत मेहनत घेतली. त्याची दखल अनेक मोठे
मोठ्या शिवचरित्राच्या अभ्यासकांनी तसेच वृत्तपत्राने देखील घेतली.
आता वेळ आली आहे अजून मोठ्या प्रमाणावर यावर्षीचा 360 वा 'मराठा आरमार दिन' साजरा करण्याची.......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला धान्य, लाकूड व इतर चीजवस्तूंच्या
पुरवठ्याबरोबर जुलमी सिद्दीला थोपविण्यासाठी आरमाराची उभारणी केली असली,
तरीही पोर्तुगीज-इंग्रज या परकीयांना धडा शिकविण्यासाठी आरमार उभारले,
नव्हे ..... तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते वाढविले. इतके कि..... मराठी
माणूस शिवकाळातच इराण, पर्शिया, मोखा येथे व्यापाराकरिता जाऊ लागला.....
एवढेच काय तर पुढे जाऊन बलाढ्य मुघलांनाही ज्यांच्याकडून परवाने विकत
घ्यावे लागत होते त्या पोर्तुगीजांना 'कान्होजी आंग्रे-संभाजी
आंग्रे-तुळाजी आंग्रे व मराठा आरमाराने' धडा शिकविला. आणि पोर्तुगीजांसह
सर्वांना मराठा आरमाराकडून परवाने घेण्याची परिस्थिती निर्माण केली.
पैश्याची-माणसांची-साधनसामग्रीची-तंत्रज्ञांची कमतरता असूनही अत्यंत
प्रतिकूल परिस्थितीत शिवरायांनी आरमार उभे केले...... ते वाढविले. आपल्या
मावळ्यांना बलाढ्य शक्तींशी लढण्याची प्रेरणा दिली आणि मावळ्यांनी देखील
प्रदीर्घ काळ लढा दिला. त्याचे कारण म्हणजे....... शिवरायांनी आपल्या
मावळ्यांमध्ये निर्माण केलेली राष्ट्रनिष्ठा, उच्च नीतिधैर्य, त्याग आणि
बलिदानाची तयारी........
माझ्या सहकाऱ्यांनो, ज्याप्रमाणे आपण
अफझलखानास मारले म्हणून 'शिवप्रतापदिन' साजरा करतो...... महाराज आग्र्याहून
सुटून राजगडावर आले तो दिवस, लालमहालामध्ये शाहिस्तेखानाची बोटे छाटली तो
दिवस 'स्मरण-दिन' म्हणून साजरा करतो. तसेच हजारो वर्षांच्या खंडानंतर
अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये आरमार उभा करणारा व दूरदृष्टीने ते वाढविणारा
असा 'युगप्रवर्तक शिवछत्रपती' हा जाणता-राजा होता. आरमार / नौदल याबाबत
शिवरायांनी केलेल्या कर्तृत्वाचे जगभरातून कौतुक होते. मग आम्ही का मागे
राहायचे..... ?
त्यामुळे शिवरायांनी आरमाराच्या दृष्टीने केलेल्या
अलौकिक कार्याचे स्मरण म्हणून आपण ज्याप्रमाणे मागील वर्षी हा 'दिवस' साजरा
केलात, त्याचप्रमाणे याहीवर्षी एखादा उपक्रम, कार्यक्रम राबवून किंवा
नाविन्यपूर्ण पोस्ट टाकून किंवा आपणास जमेल त्याप्रमाणे हा 'विशेष दिन'
साजरा करावा, ही नम्रतेची विनंती.........
No comments:
Post a Comment