Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – १६

भाग – १६
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
कुळवाडी कुळभूषण छत्रपती शिवाजी महाराज
वैदिक धर्म पंडितांनी अठरा पगड जातींवर आणि बारा बलुतेदारावर सहा प्रकारच्या बंद्या घातल्या होत्या.त्यातील बंदी क्रमांक १) धर्म बंदी २) शास्त्र बंदी ३) शस्त्र बंदी ४) व्यापार बंदी ५) धनसंचय बंदी ६) समुद्र प्रवास बंदी अशा प्रकारच्या त्या बंद्या होत्या.या सर्वांना भेद देण्यासाठी शिवरायांनी अठरा पगड जातींच्या म्हणजे अस्पृश्य आदिवासी - कोळी – भंडारी – रामोशी – बंजारा – धनगर इत्यादी जातीच्या लोकांजवळ जमिनी नव्हत्या त्यांना जमिनी बाळगण्याचा अधिकार नव्हता.त्यांना जमिनी देऊन त्यांना क्षेत्रीय बनवून शेती विषयक व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून दिली.वैदिक धर्म पंडितांनी घातलेली व्यापार बंदी उठवून वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी जातीय व्यावस्थेला दुसरा हादरा दिला.पहिला हादरा होता तो शस्त्र बंदी उठविण्याचा आणि दुसरा हादरा होता तो व्यापार बंदी उठविण्याचा यावरून स्पष्ट असे दिसते की,ते हिंदू धर्मीय नव्हते. असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ३४ वर “कुळवाडीभूषण” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


No comments:

Post a Comment