भाग – २०
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
स्वराज्यात ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांचे अस्तित्व दिसत नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या बावीस प्रतिज्ञा मधील प्रतिज्ञा
क्रमांक १,२ आणि ३ मध्ये त्यांनी सांगितले आहे की,मी ब्रह्मा विष्णू महेश
राम कृष्ण गौरी गणपती मानणार नाही त्याची उपासना करणार या प्रतिज्ञाचे
विश्लेषण केले आणि शहाजीराजे – माता जिजाऊ – छत्रपती शिवाजी महाराज –
छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तपासला तर असे दिसते की,वैदिक धर्म
पंडितांच्या सनातनी हिंदू धर्मात सांगितलेले ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण
गौरी गणपती यांचे अस्तित्व कोठेही दिसत नाही....कारण ज्या वेळेस छत्रपती
शिवराय यांनी राजधानी बांधायचे ठरविले तेव्हा राजधानी बांधण्याची जबाबदारी
हिरोजी बेलदार याने स्वीकारली.संपूर्ण राजधानी बांधून झाल्यावर हिरोजी
बेलदार याने जगदेश्वराचे मंदिर बांधले म्हणजे शिवलिंग मंदिर
बांधले.त्याठीकाणी कोणतेही ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांचे
मंदिर बांधलेले नाही.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती
संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ४८ वर “राजधानीचा
शिल्पकार हिरोजी बेलदार” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती
शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द
धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment