Friday, 20 October 2017

बळीराजा—महावीर—बुध्द—सम्राट अशोक यांचा वंशज कालकथित झाला....! भाग – २७ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!


भाग – २७
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
बळीराजा—महावीर—बुध्द—सम्राट अशोक यांचा वंशज कालकथित झाला....!
वैदिक धर्म पंडितांनी सनातनी जातीय व्यावस्था टिकविण्यासाठी केलेल्या हत्यांचा इतिहास खूप मोठा साक्षीदार आहे.
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
शहाजीराजे यांचे संकल्पनेतील स्वराज्य उभारण्यासाठी छत्रपती शिवरायांनी बालपणापासून अत्यंत कष्ट केले आहे.या स्वराज्याच्या पायाभरणीमध्ये सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे खूप मोठे मोलाचे योगदान आहे.शिवगंगा खोरे येथील(खेड शिवापूर) पासलकर वाड्याने खूप मोठे योगदान दिलेले आहे.या पासलकर वाड्याचे संरक्षण यल्ल्या मांग करीत होता.माता जिजाऊ आणि शिवराय कर्नाटक येथे युद्धाभ्यास करून सरसेनापती वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर - शेलार मामा यांचे बरोबर याच पासलकर वाड्यात येऊन राहिले होते...याच पासलकर वाड्यातून शहाजीराजे यांनी प्रचंडगडाचे राजे रायनाक परवारी यांचे नावे दिलेला स्वराज्य उभारणी संदर्भातील लखोटा वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर - शेलार मामा यांनी रायनाक परवारी यांचेकडे दिला....त्यांनी तो लखोटा वाचताच ”प्रचंडगड” स्वराज्याच्या स्वाधीन केला असल्याचे त्यांना सांगितले. प्रचंडगडावर स्वराज्याचे तोरण चढविण्यासाठी शिवराया बरोबर वीर बाजी पासलकर - नेताजी पालकर - शेलार मामा - यल्ल्या मांग - गणोजी शिर्के - झुंजारराव मरळ - हैबतराव शिळीमकर - शिंदे (शिखलकरी) - सपकाळ इत्यादी मावळे गेले होते.शिवराय प्रचंडगडावर येताच रायनाक परवारी यांनी स्वराज्यासाठी प्रचंडगड स्वाधीन केला...आणि शिवरायांनी यल्ल्या मांगाच्या हातून स्वराज्याचे पहिले भगवे निशाण प्रचंडगडावर उभे केले.स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून शिवरायांनी प्रचंडगडाचे तोरणगड असे नामकरण केले.त्यानंतर पासलकर वाड्यात येऊन आपल्या मावळ्या बरोबर स्वराज्याची पुढील योजना आखली (स्वराज्याची शपथ घेतली.) याच पासलकर वाड्यातून माता जिजाऊ आणि शिवरायांनी स्वराज्याचा राज्य कारभार सुरु केला.स्त्री सन्मान न राखणारा रांझाचा गुजर पाटील याचे हातपाय कलम करण्याचे पहिले शिक्षेचे फरमानाची मोहर याच पासलकर वाड्यातून देण्यात आली.याच पासलकर वाड्यातून स्वराज्याची पहिली राजधानी राजगड निर्माण करण्याचे कार्य सुरु झाले.त्यानंतर राजगडा वरून स्वराज्याचा कारभार सुरु झाला.शिवरायांनी २२ वर्ष या राजगडा वरून स्वराज्याचा कारभार पाहिला.संभाजीराजे यांनी शाक्त धर्म स्वीकारल्यानंतर......आणि शाक्त धर्म पद्धतीत झालेल्या दुसऱ्या राज्यभिषेका नंतर स्वराज्याचा विस्तार दक्षिणेत करावा यासाठी छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली होती.यावेळेस शिवरायांनी व सोयराबाईनी संभाजीराजेना दिलेल्या गुप्त सल्ल्यानुसार संभाजीराजे शृंगारपुर येथे त्यांचा विध्याभ्यास सुरु झाला होता.....धर्मशास्त्रावर चर्चा वादविवाद घडत होते.उमाजी पंडित – कवी कलश – गणेशभट जांभेकर – केशव उपाध्याय यांना वादविवादात निरुत्तर करीत होते.त्यांनी ब्रजभाषेत म्हणजे भोजपुरी भाषेत “नायिकाभेद” आणि “नखशिख” तसेच संस्कृत भाषेत “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहून त्यांनी वैदिक धर्म पंडितांनी त्यांच्या धर्मशास्त्रानुसार अठरा पगड जातींवर आणि बारा बलुतेदारावर सहा प्रकारच्या बंद्या घातल्या होत्या.त्या सर्व बंद्या मोडीत काडून वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी जातीय व्यावस्थेला हादरा दिला. शाक्त धर्माचे अनुयायी पिलाजी शिर्के यांच्या मुलाला आपली कन्या देऊन त्यांची कन्या सईबाई यांना आपली सून करून घेतले वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्माला त्यानी कधीही थारा दिला नाही.शाक्त धर्म स्वीकारून शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्यभिषेक करून घेतला.वैदिक धर्म पंडितांचा धर्म नाकारणाऱ्या संभाजीराजे यांची बदनामी करून त्यांना विषप्रयोगाने हत्या करण्याचा प्रयत्न याच वैदिक धर्म पंडितांनी केला होता.आपला राजा शाक्त व बौध्द धर्मीय असल्याने रयतेने वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्म पाळण्यास विरोध केला होता....त्यात संभाजीराजे शाक्त बौध्द धर्म पंडित झाले होते.ज्या वैदिक धर्म पंडितांनी आपला धर्म टिकविण्यासाठी शिवलिंग मंदिराचे पूजक समतावादी असुरवंशीय राजे यांची हत्या केली.ज्या संतानी वैदिक धर्म पंडितांनी धर्मा विरोधात मानव धर्म प्रस्थापित केला...त्या संताची हत्या या वैदिक धर्म पंडितांनी केली.ज्यांनी आपला धर्म प्रस्थापित करण्यासाठी बौध्द धर्मीय लाखो भिकुंची हत्या केली....असे वैदिक धर्म पंडित छत्रपती शिवाजी महराज आणि संभाजीराजे यांची हत्या करण्याच्या तयारीत होते.३ एप्रिल १६८० ची काळरात्र होती...छत्रपती शिवराय रात्री झोपायला गेले...पण दुसऱ्या दिवशी ते उठलेच नाही.शिवरायांचे आकस्मित निधन झाले...आकस्मित निधन म्हणजे...मृत्यूचे कारण दिसून येत नाही.शिवरायांच्या मृत्यूची बातमी रयतेला समजू नये..यासाठी रायगडाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते....त्याबाबतची काळजी वैदिक धर्म पंडितांनी घेतली होती.शिवरायांना मंत्राग्नी देण्याएवजी त्यांना भडाग्नी देण्यात आला....काही इतिहासकार यांचे म्हणणे आहे की,शिवरायांना विषप्रयोग करण्यात आला होता. विषप्रयोगाने त्यांचे शरीर काळे निळसर पडले होते हे रयतेने पाहिले....तर आपले काही खरे नाही.म्हणून शिवरायांची हत्या दडविण्याचे कार्य वैदिक धर्म पंडितांनी केले होते.जसे संत तुकाराम महाराज यांची हत्या करून त्यांना विष्णूच्या विमानाने जिवंत विमानातून वैकुंठात नेले अशी कहाणी तयार करण्यात आलेली आहे.वैकुंठ पाताळात आहे...पाताळात विमान कधीही जात नाही...तरीही आम्ही हे सत्य मानून आजही त्या वैदिक धर्म पंडितांची ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती म्हणून पूजा करीत आहोत......असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ६८ वर “युगांत” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

No comments:

Post a Comment