Wednesday, 25 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग - ३७

भाग – ३७






लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
ज्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी परशुराम वंशज वेदिक धर्म पंडितांना कराड याठिकाणी बेड्या ठोकून संभाजीराजे यांच्या समोर उभे केले.ते हंबीरराव मोहिते वाईच्या लढाईत धारातीर्थ पडले. स्वार्थी वतनदारांनी व फितुरांनी डोके वर काढले.संभाजीराजांच्या सामाजिक व धार्मिक धोरणांना त्यांचा विरोध होता.रायगडावर राजारामला मोगलांच्या हवाली करण्याचे कटकारस्थान झाले...संभाजीराजांनी ते मोडून काढले.औरंगाजेबाने आपल्या मोठ्या फौजा शहजादा अज्जम व शेख निजाम “मुकर्रबखान” याचे बरोबर स्वराज्यावर पाठविल्या. मुकर्रबखान पन्हाळगड्याला वेढा घालण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शंभूराजे पन्हाळगड्याला गेले.पन्हाळगड्याचा बंदोबस्त करून ते खेळण्याला व संगमेश्वरला गेले.सरसेनापती म्हालोजी घोरपडे,कवी कलश यांचे बरोबर संभाजीराजे संगमेश्वर येथे थांबले.वैदिक धर्म पंडित रायगडावर पुन्हा कारस्थान करण्याच्या तयारीत असल्याची खबर संभाजीराजे यांना मिळाल्यामुळे त्यांनी वैदिक धर्म पंडित प्रल्हादपंत व इतरांना अटक करण्याचे आदेश दिले. आपल्या सोबतच फौजफाटा त्यांनी रायगडाला पाठविला आणि म्हालोजी घोरपडे,कवी कलश निवडक ५०० ते ६०० सैनिकासह संभाजीराजे संगमेश्वर येथे थांबले.तेवढ्यात वैदिक धर्म पंडितानी पुन्हा घात केला.त्यांनी कोल्हापूर येथे मुकर्रबखानाला संभाजीराजे संगमेश्वरी असल्याचे व त्यांच्या सोबत मोजकेच सैनिक असल्याची खबर दिली.अस्तीनातील निखाऱ्यानी स्वराज्याच्या भवितव्याला आग लावली...असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक १०२ वर “अस्तीनातले निखारे” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

No comments:

Post a Comment