Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २३

भाग – २३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
हे पहा आले लबाड अमात्य....!
युवराज संभाजीराजे रयते बरोबर समतेने वागत होते.शुद्रातील शुद्र जातीतील पराक्रमी लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार नेमणुका देत होते.स्त्री सन्मान करीत होते..मंत्र्यांचा भ्रष्ट कारभार दरबारात जाहीरपणे उघड करीत होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे त्यांनी केलेल्या खोट्या तक्रारीवर कोणतीही दाखल न घेतल्यामुळे दरबारातील मंत्री वैदिक धर्म पंडित चिडले होते...त्यातील आण्णाजी दत्तो – प्रल्हादपंत – राहुजी सोमनाथ इत्यादी मंत्री अस्वस्थ झाले होते.त्यानी त्यांचे प्रमुख अस्त्र युवराज संभाजीराजे यांच्या विरोधात चालविण्याचे ठरविले....आणि ते म्हणजे “अफवा” संभाजीराजांची पद्धतशीर बदनामी सुरु केली. “संभाजी दुर्व्यहारी व व्यसनी आहे.” “तो मदिरा व मदिराक्षीचा गुलाम आहे”आणि तो आमावस्य व पौर्णिमेला स्मशानात जाऊन अघोरी कृत्य करतो...काही तर स्वत: डोळ्यांनी पाहिले असे सांगत होते...तर काही असे म्हणत की,विश्वसनीय सूत्राकडून सजले असे म्हणत होते.अशा अफवांचा बाजार पिकला होता....त्यामुळे पराक्रमी – बुद्धिमान – प्रजाहितदक्ष – शाक्त धर्मीय समतावादी संभाजीराजांची बदनामीमुळे शिवरायांच्या मनाला असंख्य वेदना होत होत्या...काहींनी संभाजीराजे यांचेवर विषप्रयोग केले होते.....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ५८ वर गोबेल्सचे “देशी पूर्वज” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

No comments:

Post a Comment