Friday, 27 October 2017

भगवा ध्वज



तुळापुर येथील संभाजी महाराज यांच्या हातमधील भगवा ध्वज,गौतम बुध्द – सम्राट अशोक – वारकरी संप्रदाय – आणि शहाजीराजे यांचे स्वराज्याचे भारतीय निवासी यांचे प्रतिक आहे...तो हिंदू धर्माचा ध्वज नव्हे....सनातनी आर्य समाज यांचा स्वास्तिक चिन्ह असलेला काळा ध्वज आहे.
             
भारत देशाला गौतम बुध्द यांनी भगवा ध्वज देऊन त्याचे चीवर म्हणून परिधान केले आहे.सम्राट अशोक यांनी संपूर्ण भारतात हा भगवा ध्वज भारतीय निवासी यांचा सन्मान म्हणून सर्वत्र पोहचविलेला आहे.त्याकाळी आर्य समाज वैदिक धर्म पंडितांचा ध्वज हा स्वस्तिक असलेला काळा ध्वज होता.त्यांचा आणि आपल्या भगव्या ध्वजाचा कोणताही संबध येत नाही.भगवान गौतम बुद्धापासून चालत आलेला भगवा ध्वज नंतरच्या काळात संत नामदेव महाराज यांनी वैदिक धर्म पंडितांच्या विरुध्द लढा उभारण्यासाठी वारकरी सांप्रदाय निर्माण करून तो भगवा ध्वज त्यांच्या हातामध्ये दिला.भारताच्या हिंदू संस्कृतीच्या परंपरागत तो भारतीय मुळ रहिवासी म्हणजे नागवंशी लोकांचे प्रतिक होते.शहाजीराजे मोगल साम्राज्यात असताना स्वराज्य संकल्पित ध्वज हा भगवा ध्वजच त्यांनी केला होता.आणि हा भगवा ध्वज शिवराय यांचे हाती स्वराज्याचे भगवे निशाण म्हणून दिला होता.संत तुकाराम महाराज यांनी हाच भगवा ध्वज हाती घेऊन स्वराज्य सेना निर्माण केली होती.नंतरच्या काळात पेशव्याने याच स्वराज्याचा भगवा ध्वजाच्या निशाणाखाली लाल महालावर शनिवार वाडा बांधून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बुजवून त्यांचे विचार लपवून स्वत: राजा झाला होता.मात्र सिद्ध्नाक महार या स्वराज्याच्या सरदाराने भीमा कोरेगाव याठिकाणी लाल महालावर ताबा मारलेल्या शनिवार वाड्याच्या विरोधात भगवा ध्वज हातात घेऊन पेशवाई संपवून टाकली...आणि स्वराज्याचा भगवे निशाण पुन्हा लाल महाल म्हणून प्रस्तापित करणार तेव्हा वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी विचारांनी तो शनिवार वाड्यावरील भगवा ध्वज उतरून स्वत:च्या हाताने ब्रिटीशांचा कंपनी जॅक त्या लाल महालावर म्हणजे शनिवार वाड्यावर चढविला आणि स्वराज्याचा पाडाव पुन्हा एकदा या वैदिक धर्म पंडितांनी केला...आणि स्वराज्यातील शिवराय आणि संभाजीराजे यांचा इतिहास लपवून टाकला....मात्र भगवा ध्वज त्यानी कधीही हातामध्ये घेतला नाही.महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि त्यांचे समतावादी विचार लोकामध्ये पोहचविण्यासाठी त्यांनी शिवरायांची जयंती उत्सव सुरु केला.यावरून लक्षात येते की,वारकरी संप्रदाय आणि शिवजयंती उत्सवामध्ये भगवा ध्वज हा काही वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्माचे प्रतिक नव्हते.महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक धर्म स्थापन केला होता.तेव्हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू धर्म स्थापन करून या भगव्या ध्वजावर ताबा मारण्याचे कार्य केले...आणि हा हिंदू धर्माचा ध्वज वाटावा म्हणून मोदक खाणारा गणपती याचा जन्म झाला.बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी हा भगवा ध्वज हिंदू धर्माचा आहे हे भासविण्यासाठी गणेश उत्सव सुरु करून या उत्सवाचे प्रतिक म्हणून भगवा ध्वज उभा केला.त्यानंतर संभाजी ब्रिगेड नावाची संघटना अस्तित्वात आली....आणि त्यांनी हा भगवा ध्वज हिंदू धर्मियांचा नसून समतावादी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा आहे असा प्रचार सुरु केला.हे पाहून सनातनी हिंदू धर्मीय पुन्हा गडबडले आणि त्यांनी तुळापुर आणि वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ ताब्यात घेऊन त्याठिकाणी धर्मवीर संभाजीराजे यांचा पुतळ्यावर संभाजीराजे यांच्या हातातील भगवा ध्वज हिंदू धर्माचा असून छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी बलीदानी झाले असा खोटा प्रचार जोरात सुरु केला आहे.
                                                    राजेश खडके
                                            अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन

Thursday, 26 October 2017

भाग – ४७ लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....? संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!

भाग – ४७
लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....?
संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!
छत्रपती संभाजी महाराज यांना अखेरची मानवंदना....शूर वीर ऐतिहासिक पुरुष महार समाजाचीच...!
दि.११ मार्च १६८९ रोजी संभाजीराजांची हत्या केल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वढू बुद्रुक गावच्या माळरानावर फेकण्यात आले.जे कोणी या प्रेतला अग्नी देतील त्यांनाही ठार मारले जाईल.अशी दवंडी पिटविण्यात आली.तेथील महार समाजातील गायकवाड कुटुंबाला आपल्या लाडक्या राजाची विटंबना सहन झाली नाही.त्यानी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून ते शिवून आपल्या वस्ती जवळ छत्रपती संभाजी महाराज यांचेवर अंत्यसंस्कार केले.शाक्त धर्म स्वीकारून स्त्रीमुक्ती आणि जातीअंतासाठी संघर्ष करणाऱ्या व त्यासाठी हुतात्म पत्करणाऱ्या शंभूराजाच्या मृतदेहाचे तुकडे स्त्रीयांनी शिवून त्यांचा अंत्यविधी करून या समतावादी योद्ध्याला अखेरची मानवंदना दिली...आणि त्याठिकाणी संभाजीराजांची समाधी बांधून आजही त्याची निगा ते राखीत होते...परंतु आज त्याठीकाणी आरएसएसचे हेगडेवार यांचा मोठा फोटो उभारून त्याठिकाणी सनातनी हिंदू धर्मियांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा विपर्यास करून त्यांचे समतावादी कर्तुत्व संपविण्याचा घाट घातला जात आहे.....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक १२४ वर “अखेरची मानवंदना” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत

भाग – ४६ संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......! असे नमन माझे तुला.... इंद्रायणी-भीमा

भाग – ४६
संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!
असे नमन माझे तुला.... इंद्रायणी-भीमा
तुळापुर याठिकाणी शहाजीराजे यांनी स्वराज्य संकल्पित करून स्वराज्याची पायभरणी केली होती.याठिकाणी संभाजीराजांची हत्या करून ऐतिहासिक काळा दिवस वैदिक धर्म पंडितांनी इतिहासाच्या पानात नोंद करून घेतला आहे.त्यांच्या अशा कृत्याने निसर्गही हादरून गेला.त्याच्याही नयनातून रक्ताचे अश्रू वाहिले गेले आणि त्यामुळे चिंब झाल्या इंद्रायणी-भीमा...!
असे नमन माझे तुला.... इंद्रायणी-भीमा

Wednesday, 25 October 2017

भाग – ४५ लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....? संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!

भाग – ४५
लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....?
संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!
संभाजीराजांची हत्या ११ मार्च १६८९ मध्ये तुळापुर येथे करून....१२ मार्च १६८९ मध्ये पेशवाईची पायाभरणी करण्यात आली.....?
घरावर उंच उंच गुढी उभारून...गुढीपाडवा पाडवा साजरी करून...स्वराज्याचा पाडाव दिवस साजरा करू नका....!
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
जिजाऊ प्रकाशन
संभाजीराजांचा मृत्यू नंतरचा दुसरा दिवस,१२ मार्च १६८९,चैत्र शुध्द प्रतिपदा शके १६११,पंचांगाचा पहिला दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा...! आजूबाजूच्या परिसरात शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती,संपूर्ण रयत प्रचंड दु:खात होती.वैदिक धर्म पंडितांच्या मनाप्रमाणे मनुस्मृतीचा म्हणजे मनूचा विजय झाला होता.या विजयाची विजयगाथा म्हणून त्यांनी संभाजीराजांचे मस्तक भालाच्या टोकावर अडकवून मिरविण्यात आले.विकृत सनातनी वैदिक धर्म पंडित आनंदित होता.कारण त्यांच्या दुष्टीने संभाजी धर्मद्रोही होता.शुद्र असून त्याने वेद वाचले होते.त्याने चातुर्वण्यवर आधारित विषमतावादी वैदिक ब्राह्मणी धर्म नाकरून समतावादी शाक्त धर्म स्वीकारला होता.त्याने आपल्या पित्याचा शाक्त राज्यभिषेक करून पूर्वीचा वैदिक राज्यभिषेक बाद ठरविला होता.वैदिक धर्माची स्त्रीयांना शुद्र ठरविणारी धर्माज्ञा नाकरून येसू बाईला राज्य कारभार सोपविणे हा देखील त्याचा अपराध होता.स्वराज्यद्रोही ब्राह्मण मंत्र्यांना मारून त्याहे ब्रह्महत्येचा सर्वात मोठा घोर अपराध केला होता.वैदिक ब्राह्मणी व्यावस्थेच्या शत्रूचा अंत त्यांच्या मानाजोकता झाला होता.त्यांना पेशवाईची पायाभरणी झाल्याचा आनंद झाला होता.त्यांनी आपल्या घरावर उंच उंच गुढ्या उभारल्या.काहींनी साखर वाटली..तर काहींनी पेढे...असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक १२० वर “पाडवा नंतरचा पाडवा” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

भाग – ४४ लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....? संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!

भाग – ४४
लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....?
संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!
संभाजीराजांची हत्या ११ मार्च १६८९ मध्ये तुळापुर येथे करून....१२ मार्च १६८९ मध्ये पेशवाईची पायाभरणी करण्यात आली.....?
३८ दिवसांच्या प्रवासात स्वराज्यातील वीर मराठा सरदार होते कोठे.....?
जिजाऊ प्रकाशन
जेरबंद संभाजीराजांना बहादूर गडावरून ३ मार्च १६८९ रोजी भीमा कोरेगाव येथे आणण्यात आले.वैदिक धर्म पंडितांनी मनुस्मृती नुसार सांगितलेल्या शिक्षेप्रमाणे संभाजीराजांची जीभा छाटण्यात आली.मनुस्मृती नुसार डोळे फोडण्यात आले.....त्याच अवस्थेत इंद्रायणी-भिमा-भामा नदीच्या तीरावर ज्या गावातून आणले..ज्या गावात त्यांच्यावर फुले उधळली गेली त्या गावाचे नाव आज “फुलगाव” पडले आहे.ज्या गावात त्यांना आपटी दिली त्या गावाचे नाव आज “आपटी” म्हणून उदयास आले आहे.....आणि ज्या गावात त्यांना वडाच्या झाडाला मरगळ येईपर्यंत बांधण्यात आले....त्या गावचे नाव आज “मरकळ” पडले आहे.शहाजीराजे यांनी ज्या गावामध्ये नदीच्या किनारी घाट बांधला.दुष्काळाच्या काळात हत्तीची तुळा त्याच घाटावर करून हत्तीच्या वजना एवढे सोनी चांदी देऊन त्या दुष्काळग्रस्त गावांना मदत केली.ज्या गावात तुळा झाली त्या गावाला आज “तुळापुर” म्हटले जाते....आणि त्याच गावात शहाजीराजे यांनी “स्वराज्य” संकल्पित केले.....त्याच तुळापुर गावात संभाजीराजांच्या शरीराचे ११ मार्च १६८९ रोजी तुकडे तुकडे करून.....हत्या करून मनुस्मृतीचे शिक्षेची अमलबजावणी करून छत्रपती संभाजीराजांचे शिर भाल्यावर लटकून इंद्रायणी-भिमा-भामा नदीच्या मधोमध शिर लावलेला भाला वाळू मध्ये रोऊन ११ मार्च १६८९ रोजी स्वराज्याचा पाडाव करून...पेशवाईची पायाभरणी करण्यात आली.कोकण येथील संगमेश्वर गाव ते बहादूरगड...आणि बहादूरगड ते तुळापुर असा ७०० मैलांचा प्रवास जेरबंद छत्रपती संभाजीराजांचा सुरु होता.संगमेश्वर येथून पळून गेलेला मराठा सरदार संताजी घोरपडे ३८ दिवस काय करत होता...आणि संभाजीराजांची धिंड संपूर्ण स्वराज्यातून काढण्यात आली...त्या स्वराज्यातील वीर मराठा सरदार काय करत होते....त्यानी संभाजीराजांना वाचविण्यासाठी प्रयत्न का केले नाही....? इतिहासात संभाजीराजांना सोडविण्यासाठी एकही बलिदान का गेले नाही....? इंद्रायणी-भिमा-भामा नदीच्या पंचकृशीतील मराठा सरदार काय करीत होते...? असा प्रश्न लेखकाला पडला असल्यामुळे....यावरून असे स्पष्ट होते की,छत्रपती संभाजीराजे हिंदू नव्हते....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ११८ आणि ११९ वर “अमानुष अमानवी शिक्षा” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.



भाग – ४३ लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....? संभाजीराजांची हत्या एक षडयंत्र......!

भाग – ४३
लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा....?
संभाजीराजांची हत्या एक षडयंत्र......!
कोकण येथील संगमेश्वर ते दौंड येथील बहादूरगड असा जेरबंद संभाजीराजे यांचा प्रवास....!
स्वराज्यातील वीर मराठा सरदार होते कोठे.....?
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
जेरबंद संभाजीराजांना लवकरात लवकर देहदंडाची शिक्षा देण्याची औरंगाजेबाची इच्छा होती.वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबाला असे सांगितले की,संभाजीराजा सनातनी हिंदू राजा आहे.त्याला तुमच्या शरियत नुसार तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही.त्यामुळे संभाजीला तुम्ही हिंदू पद्धतीत शिक्षा दिली पाहिजे.मग त्या धर्म पंडिताने मनुस्मृती घेऊन आला....आणि त्यामध्ये मनूने दिलेली शिक्षेनुसार संभाजीराजांना शिक्षा देण्याचे ठरविण्यात आले.....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ११६ वर “सनातनी शिक्षा” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत


भाग – ४२ संभाजीराजांची हत्या एक षडयंत्र......!


भाग – ४२
संभाजीराजांची हत्या एक षडयंत्र......!
कोकण येथील संगमेश्वर ते दौंड येथील बहादूरगड असा जेरबंद संभाजीराजे यांचा प्रवास....!
स्वराज्यातील वीर मराठा सरदार होते कोठे.....?
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
कोकणात संगमेश्वर येथे दिनांक ४ फेब्रुवारी १६८९ रोजी जेरबंद केलेल्या संभाजीराजांना दिनांक १४ फेब्रुवारी १६८९ मध्ये बहादूरगडापासून दोन कोसांवर पर्यंतच्या अंतरावर पोहचले होते.बादशहाला खबर देण्यात आली.बादशहाने आहे तेथेच थांबण्याचा हुकुम देण्यात आला व हमीउद्दीनखानास त्याच्या स्वागत करण्यास पाठवून दिले.बादशाही हुकुमाप्रमाणे संभाजीराजांच्या अंगावर ‘तक्ता कुलाह’ म्हणजे इराण मध्ये गुन्हेगारांना घालतात तसा पोशाख व उंच लाकडी टोपी चढविण्यात आली.त्यांना मरतुकड्या उंटावर उलटे बसविण्यात येऊन ढोल बडवीत कर्णे व शिंगे वाजवीत अपनास्पद रीतीने फजिती करीत त्यांची धिंड काढण्यात आली.दोन्ही बाजूने मोगली छावणी होती.मोगली सरदारांनी व सैनिकांनी संभाजीराजे यांना पाहण्यासाठी दोन्ही बाजुमे गर्दी केली होती....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक १११ वर “धिंड” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

भाग – ४१ संभाजीराजांची हत्या……..एक षडयंत्र......! लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
संभाजीराजांची हत्या……..एक षडयंत्र......!
स्वराज्यातील वीर मराठा सरदार संताजी घोरपडे पळून जाण्यास यशस्वी....!
कोकण येथील संगमेश्वर ते दौंड येथील बहादूरगड असा जेरबंद संभाजीराजे यांचा प्रवास सुरु....!
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
कोकणातील संगमेश्वर येथे असणारे संभाजीराजांना चुकीची खबर मिळाली होती की,चारशे ते पाचशे मोगल सैनिक आले आहेत...परंतु ते अडीच हजार मोगल सैनिक होते.त्यांचे बरोबर असणारा सरदार संताजी घोरपडे आणि खंडोजी बल्लाळ पळून गेले.मोगल सैनिकांनी पूर्ण घेराव संभाजीराजांना घातला होता.मूकर्बखान याचा मुलगा इखलासखान याने संभाजीराजांना साखळदंड घालून अखेर जेरबंद केले.संभाजीराजे निसटून जाऊ नये याची पूर्ण खबरदारी मूकर्बखान याने केली होती.संभाजीराजे यांना जेरबंद केल्याची बातमी अकलूज येथे तळ ठोकून बसलेल्या औरंगाजेब याला देण्यात आली होती.त्याने आपली छावणी दौंड येथील बहादूरगडाकडे हलविली आणि संभाजीराजांना तिकडे घेऊन येण्यास सांगितले. मूकर्बखान याचे बरोबर वाटाडे असणारे धर्म पंडित अत्यंत आनंदित झाले होते. जेरबंद केलेले संभाजीराजे यांचा अत्याचाराचा प्रवास सुरु झाला...असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ११० वर “जेरबंद” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत


लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ४०



भाग – ४०
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती संभाजीराजांचा अखेरचा रणसंग्राम

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३९

भाग – ३९
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
“मुकर्रबखान” याने संगमेश्वर मध्ये प्रवेश करताच आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या पहिल्या चार-पाचशे तुकड्याचे नेतृत्व त्याने त्याचा मुलगा इसलासखान यांचेकडे दिले.आणि त्याच्याच पाठोपाठ दोन हजार सैन्याचे तो नेतृत्व करीत होता.याची खबर संभाजीराजांना लागली तेव्हा ते देसाई वाड्यात होते.तेव्हा त्यांनी म्हालोजी भोसले व कवी कलश यांचे बरोबर चर्चा केली.संभाजीराजे यांनी रायगडाला जावे.आणि भोसले कलश येणाऱ्या सैन्य बरोबर लढणार असे ठरले...परंतु संभाजीराजांना धोका पत्करायचा नव्हता त्यांना शत्रू चार पाचे सैन्य घेऊन आला आहे अशी खबर मिळाली होती.आपल्याकडेही चार पाचशे सैनिक आहेत त्यामुळे म्हालोजी भोसले आणि कवी कलश यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हते.तेव्हा त्यांनी लढायचा निर्णय घेतला.त्यांना चुकीची खबर मिळाली होती इतके भयानक षडयंत्राची चाहूल संभाजीराजांना
झाली नव्हती...मग नेमके वैदिक धर्म पंडितांनी असे कोणते षड्यंत्र आखून ठेवले होते.आणि संभाजीराजे जर हिंदू धर्मीय होते तर हे षड्यंत्र कशासाठी....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक १०४ वर “खबर लागली” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग - ३७

भाग – ३७






लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
ज्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी परशुराम वंशज वेदिक धर्म पंडितांना कराड याठिकाणी बेड्या ठोकून संभाजीराजे यांच्या समोर उभे केले.ते हंबीरराव मोहिते वाईच्या लढाईत धारातीर्थ पडले. स्वार्थी वतनदारांनी व फितुरांनी डोके वर काढले.संभाजीराजांच्या सामाजिक व धार्मिक धोरणांना त्यांचा विरोध होता.रायगडावर राजारामला मोगलांच्या हवाली करण्याचे कटकारस्थान झाले...संभाजीराजांनी ते मोडून काढले.औरंगाजेबाने आपल्या मोठ्या फौजा शहजादा अज्जम व शेख निजाम “मुकर्रबखान” याचे बरोबर स्वराज्यावर पाठविल्या. मुकर्रबखान पन्हाळगड्याला वेढा घालण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शंभूराजे पन्हाळगड्याला गेले.पन्हाळगड्याचा बंदोबस्त करून ते खेळण्याला व संगमेश्वरला गेले.सरसेनापती म्हालोजी घोरपडे,कवी कलश यांचे बरोबर संभाजीराजे संगमेश्वर येथे थांबले.वैदिक धर्म पंडित रायगडावर पुन्हा कारस्थान करण्याच्या तयारीत असल्याची खबर संभाजीराजे यांना मिळाल्यामुळे त्यांनी वैदिक धर्म पंडित प्रल्हादपंत व इतरांना अटक करण्याचे आदेश दिले. आपल्या सोबतच फौजफाटा त्यांनी रायगडाला पाठविला आणि म्हालोजी घोरपडे,कवी कलश निवडक ५०० ते ६०० सैनिकासह संभाजीराजे संगमेश्वर येथे थांबले.तेवढ्यात वैदिक धर्म पंडितानी पुन्हा घात केला.त्यांनी कोल्हापूर येथे मुकर्रबखानाला संभाजीराजे संगमेश्वरी असल्याचे व त्यांच्या सोबत मोजकेच सैनिक असल्याची खबर दिली.अस्तीनातील निखाऱ्यानी स्वराज्याच्या भवितव्याला आग लावली...असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक १०२ वर “अस्तीनातले निखारे” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

Friday, 20 October 2017

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३६

भाग – ३६
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
वैदिक धर्म पंडितांच्या धर्मशास्त्रानुसार नद्यांचे पाणी अडविणे मोठा गुन्हा आहे.ॠग्वेददेखील याची साक्ष देतो.मानवाच्या विकासाच्या आड येणाऱ्या अन्यायी धर्मज्ञाना शिव-शंभूनी नाकारले.वारंवार येणारे दुष्काळाचे संकट व त्यातून होणारी अन्य पाण्याची टंचाई आणि मानव व मुक्या प्राण्यांचा विदारक संहार या बाबी स्वराज्यासाठी नित्याच्याच होत्या.दुष्काळात रातेचे प्रचंड हाल होऊन लोक अन्नान्नदशा होत,पिके करपून जात अन्नधान्याची मोठी टंचाई होत.लोकांना मदत करण्यात स्वराज्याचा खजिना रिक्त होई.पिक न आल्यामुळे शेतसारा माफ कराव लागे.या काळात प्रजा पालनाचा राजधर्म पाळणे जिकरीचे होई.या असमानी संकटावर मात करण्यासाठी शंभूराजेनी नाले,ओढे,नद्या यांना आडवून बंधारे बांधली.उतारावरून वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी ठिकठीकाणी तळी निर्माण केली.गड-किल्ल्यावर टाके बांधले.कालवे काढून शेतीला पाणी पुरविले काही थिकानीए खोल मोठे चर खोडून प्रवाह बदलून नद्या व ओढे एकमेकांना जोडले.या उपाययोजने मुळे दुष्काळाच्या झळा सुसह्य होऊ लागल्या.अन्नधान्याचे उत्पादन वाढले.स्वराज्याच्या खजिन्यात भर पडू लागली.रयत आनंदित झाली.असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ९३ वर “सुजलाम सुफलाम” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३५

भाग – ३५
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि राजारामाच्या विवाहात मध्ये कुठेही वैदिक धर्म पंडित दिसत नाहीये...!
राजाराम हा छत्रपती शिवराय आणि सोयराबाई यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा धाकटा भाऊ होता...आपल्या धाकट्या भावावर संभाजीराजांचे खूप प्रेम होते.छत्रपती संभाजीराजे यांनी राजारामाची तीन लग्ने लावून दिली आहेत.एक सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई,दुसरे कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई आणि तिसरे खानविलकरांची मुलगी अंबिकाबाई असे त्यांच्या तीन पत्नी होत्या.या विवाहामध्ये कोणताही वैदिक धर्म पंडित नव्हता.यावरून असे दिसते की,शिवराय – संभाजीराजे आणि राजाराम हिंदू धर्मीय नव्हते असे स्पष्टपणे दिसत आहे....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ८५ वर “राजारामाचा विवाह” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३४

भाग – ३४
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई या शाक्त धर्माचे अनुयायी होते...त्यामुळे वैदिक सनातनी धर्माचा त्यांचा काही एक संबध नाही....!
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्मानुसार पुरुषप्रधान व्यावस्थेला महत्व होते.भारतीय निवासी मातृसत्ताक स्त्रीप्रधान संस्कृतीला महत्व देत होते.त्यामुळे याठिकाणी आर्य सनातन धर्म व्यावस्था ही भारतीय नव्हती...त्यांचा मूळ ध्वज हा काळा आणि स्वतिक चिन्ह असलेला होता.भारतीय निवासी हा असुरवंशीय बळीराजा - बुध्द – सम्राट अशोक – शहाजी राजे यांच्या भगवा ध्वजाला मानणारा होता.अलमगीर प्रचंड फौज घेऊन स्वराज्याच्या उमराठ्यावर उभा होता.या सर्व रणधुमाळीत मुलकी प्रशासनाकडे बारकाईने लक्ष असणे गरजेचे होते.त्यांनी महाराणी येसूबाईकडे मुलकी प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी देऊन त्यांच्या नावाचा “श्रीसखी राज्ञी जयति” हा राजमुद्रेचा स्वतंत्र शिक्का त्यांना देण्यात आला.मध्यमयुगीन त्या काळात ही क्रांतीकारी घटना होती...कारण वैदिक धर्म पंडितांनी स्त्रीला शुद्र ठरविले होते.परंतु छत्रपती संभाजी महाराज समतावादी – वर्ण जात – स्त्रीदास्य नाकारणाऱ्या धर्माचे अनुयायी होते.महाराणी येसूबाई सुविद्य,सुसंस्कृत व युध्दकुशल आणि शाक्त धर्माच्या अनुयायी होत्या... असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ८४ वर “श्रीसखी राज्ञी जयति” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३३

भाग – ३३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
वैदिक धर्म पंडित आपला सनातनी हिंदू धर्म प्रस्थापित करण्यासठी काहीही करू शकतात.
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
वैदिक धर्म पंडितांनी अकबराला लिहिलेले जहरीपत्र छत्रपती संभाजी महाराजांना मिळाले होते.महाराजांनी स्वराज्याच्या गद्दारांची धरपकड करण्याचे आदेश दिले.त्यांना अटक करून पाली - सुधारगडला अकबराकडे नेण्यात आले.त्याचे समोर उभे समोरा समोर करून कटाची खातरजमा करून त्यांना कैदेत टाकण्यात आले.या कटात सामील असलेला शामजी नाईक याला हरजीराजेंनी कर्नाटकात कैद केले.कटाचा म्होरक्या आण्णाजी दत्तो,बाळाजी आवजी,हिरोजी फर्जंद सोमाजी दत्तो यांना ६ सप्टेंबर १६८१ रोजी हत्तीच्या पायी देऊन मृत्यू दंडाची शिक्षा देऊन काहीना सुळावर चढविले...तर काहीना कडेलोट करण्याची शिक्षा देऊन वैदिक धर्म पंडितांना शिक्षा देणारे पहिले छत्रपती संभाजी महारज आहेत.समतावादी शाक्त धर्मीय संभाजी महाराज यांनी वैदिक धर्म पंडितांना दिलेल्या शिक्षेमुळे बाकीचे वैदिक धर्म पंडित अस्वस्थ झाले.....यावरून असे दिसते की,छत्रपती संभाजी महाराज हिंधू धर्मीय असते...तर हिंदू धर्म पंडितांना अशा प्रकारे शिक्षा त्यांनी दिली नसती.....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ८० वर “विषवल्ली चिरडली” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.




लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३२

भाग – ३२
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
वैदिक धर्म पंडित आपला सनातनी हिंदू धर्म प्रस्थापित करण्यासठी काहीही करू शकतात.
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
स्वराज्य कसे संपेल याची काळजी वैदिक धर्म पंडित घेत होते....कारण स्वराज्य संपले की.आपला सनातनी हिंदू धर्म प्रस्थापित करता येईल असे त्यांना माहित होते.अफजलखान हा शिवरायांवर चालून आला होता.शिवरायांना जिंदा पकडण्यासाठी तो आला होता....मात्र वाईच्या ३५० वैदिक धर्म पंडितांनी सभा बोलावून शिवरायांना मुर्दा पकडण्यासाठी त्याच्याकडे विनंती करून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.त्यावेळेस त्या वैदिक धर्म पंडितांचे नेतृत्व कृष्णा भास्कर कुलकर्णी करीत होता.प्रतापगडाच्या अफजलखान आणि शिवराय यांचे भेटी दरम्यान अफजलखानाने केलेल्या दगबाजीला शिवरायांनी त्याचे पोट फाडून उत्तर दिले होते.अफजलखान धारातीर्थ पडलेला पाहून आपला मनसुबा काही यशस्वी होत नाही असे जेव्हा त्या कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या लक्षात आले...तेव्हा त्याने बेसावध असलेल्या शिवरायांवर प्राणघातक हल्ला केला.स्वराज्यावर वैदिक धर्म पंडितांचा हा पहिला हल्ला होता शिवरायांनी त्या कुलकर्णींला माफ केले...परंतु त्याने पुन्हा हल्ला केला तेव्हा त्या स्वराज्याच्या गद्दाराला शिवरायांनी जिवंत सोडले नाही.ब्राह्मण मारल्याचे दु:ख सर्व वैदिक धर्म पंडितांना झाले होते...मात्र शिवरायां समोर आपण टिकू शकत नाही याची कल्पना त्यांना आली होती.दुखावलेले वैदिक धर्म पंडित शिवरायां सोबत राहून संधीची वाट बघत होते.परंतु युवराज संभाजीची भीती त्यांना होती...त्यांनी विषप्रयोग करून संभाजीना संपविण्याचा प्रयत्न केला होता तोही अयशस्वी झाला.छत्रपती शिवराय जर जिवंत राहिले तर आपला सनातनी धर्म संपवून जाईल.ते संधीची वाट पहात होते युवराज संभाजी पन्हाळगड्याला होते...अखेर त्यांना संधी मिळाली त्यांनी विषप्रयोग करून छत्रपती शिवराय यांची त्यांनी त्यांच्या सनातनी धर्मासाठी हत्या केली.सोयराबाई यांचेवर दबाव टाकून राजारामाला गादीवर बसवून स्वराज्याची राजधानी रायगड ताब्यात घेतला होता.आता फक्त संभाजीराजे राहिले होते त्यांना संपविण्यासाठी वैदिक धर्म पंडित पन्हाळगड्याकडे निघाले होते...परंतु कराड येथे या वैदिक धर्म पंडितांना स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अटक करून बेड्या ठोकून पन्हाळगड्याला नेऊन युवराज संभाजीराजे यांचे समोर उभे केले.त्यांनी केलेल्या कृत्याची चौकशी करण्याकरिता संभाजीराज्यांनी आपले सासरे पिलाजी शिर्के यांना रायगडाचा अधिकारी नेमून आदेश केले.चार वर्ष त्यांना कैदेत ठेऊन रायगडाला येताना त्या कैद्यांना बरोबर घेऊन आले...मात्र त्यातील एक कैदी वैदिक धर्म पंडित मोरोपंत पिंगळे कैदेतच मेले.याचे दु:ख या वैदिक धर्म पंडितांना झाले होते.एक वैदिक धर्म पंडित कृष्णा भास्कर कुलकर्णी शिवराय यांचे हातून मारला गेला....तर दुसरा वैदिक धर्म पंडित मोरोपंत पिंगळे युवराज संभाजीराजे यांचेकडून कैदेत ठेवल्यामुळे मारला गेला.रायगडला आल्यानंतर युवराज संभाजीराजे यांनी शाक्त धर्म पद्धतीत राज्यभिषेक करवून घेऊन आता ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज झाले होते.छत्रपती संभाजी महाराज यांनी या सर्व वैदिक धर्म पंडितांना माफ करून राज्यकारभारात मोठ मोठी पदे देऊन पुन्हा सन्मान दिला.वैदिक धर्म पंडितांना कोणाच्या जीवाची पर्वा नव्हती...त्यांना त्यांचा वैदिक सनातनी धर्म टिकवायचा होता त्यासाठी वाटेल ते करायला तयार होते.पुन्हा ते संधीची वाट बघत होते.....अखेर त्यांना संधी मिळाली त्यांनी छत्रपती संभाजीराजेना जेवणातून विष दिले....मात्र एका प्रामणिक सेवकामुळे त्यांचा तो प्रयत्न फसला.मोगल राजा अकबर स्वराज्यात आला हे पाहून वैदिक धर्म पंडित आण्णाजी दत्तो आणि सोमाजी दत्तो आनंदित झाला होता.हिरोजी फर्जंद नुकताच अकबराला भेटून आला होता.....या तिघांनी अकबराच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजेना संपविण्याचा पुन्हा एकदा कट रचला...त्यांनी अकबराला पत्र लिहिण्याचे ठरविले.या तीनही पाताळयंत्री यांनी अकबराला असे पत्र लिहिले की,संभाजी तुमचा मित्र आहे तुम्ही त्याला जेवायला बोलवा आम्ही विष घातलेले जेवण तुम्हाला देतो ते त्याला गोड बोलून खायला घाला....आणि संभाजीचा मृत्यू झालेवर अर्धे राज्य तुम्हाला देतो आणि अर्धे राज्य आम्ही घेतो.कारण या वेदिक धर्म पंडितांना माहित होते की,जोपर्यंत स्वराज्याचा कारभार आपल्या हातात येणार नाही तो पर्यंत आपला धर्म प्रस्थापित करता येणार नाही...आणि छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांचा समतावादी शाक्त धर्म संपविता येणार नाही.या वैदिक धर्म पंडितांनी लिहिलेले जहरीपत्र अकबराला मिळाले तो हादरून गेला....त्याने ते वाचले आणि आपला सहकारी दुर्गादास राठोड याला दाखविले....त्याने अकबराला छत्रपती संभाजीराजेनी केलेल्या मदतीची आठवण करून दिली.आणि त्याला असा सल्ला दिला की,हे पत्र तू संभाजीराजेना पाठवून तुझ्या प्रामाणिकपणाची जाणीव ठेव. दुर्गादास राठोड याने सांगितल्याप्रमाणे आपल्या खास दुताकडून संभाजीराजेना ते जहरीपत्र पाठवून दिले.यावरून स्पष्ट असे दिसते की,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे राज्य सनातनी हिंदू धर्माचे नव्हते...हिंदू धर्माचा आणि स्वराज्याचा काही एक संबध नव्हता.आपला वैदिक सनातनी धर्म कसा प्रस्थापित होईल याची व्यावूरचना हे वैदिक धर्म पंडित आखीत होते...परंतु त्यांना यश मिळत नव्हते....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा “ या पुस्तकामध्ये पान क्रमांक ७८ वर “पुन्हा कारस्थान” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – ३१

भाग – ३१
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती संभाजीराजे यांचा शाक्त धर्म पद्धतीत राज्यभिषेक सोहळा पार पडला....!
संभाजीराजे यांची हत्या करण्यासाठी निघालेले वैदिक धर्म पंडित मोरोपंत पिंगळे – प्रधान,आण्णाजी दत्तो-सचिव,प्रल्हाद निराजी-न्यायधीश,राहुजी सोमनाथ यासारखे परशुरामाचे वंशज यांना स्वराज्याचा प्रामणिक सरसेनापती हंबीरराव मोहते यांनी त्या सर्वांना अटक करून संभाजीराजे यांचे समोर पन्हाळगडावर हजर केले.त्यांनी त्यांना कैदेत ठेऊन आपले सासरे पिलाजी शिर्के यांना रायगडचा अधिकारी नेमून रायगडाला पाठवून कारस्थानाच्या चौकशीचे करण्याचे आदेश दिले.त्यानंतर संभाजीराजे रायगडावर त्या परशुरामाच्या कैदी वंशजाना बरोबर घेऊन आले.वैदिक धर्म पंडित मोरोपंत पिंगळे कैदेतच मरण पावला होता.संभाजीराजांनी शिवरायांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेतले.सर्व गडांच्या व प्रांताच्या सुरक्षतेचा आढावा घेतला.हरजी महाडिक,गणोजी शिर्के,जोत्साजी केसरकर यांच्या विनंतीला मान देऊन त्या कारस्थानी वैदिक धर्म पंडितांना माफ केले.संभाजीराजे यांनी शाक्त धर्म पद्धतीत राज्यभिषेक करून घेण्याचे ठरविले त्यानुसार १४ जानेवारी १६८१ मध्ये राज्याभिषेकाचा सोहळा सुरु झाला...आणि १६ जानेवारी १६८१ मध्ये मुख्य सोहळा पार पडला.शाक्त धर्म पद्धतीत राज्याभिषेक झाल्यामुळे समतेची व्दाही सर्वत्र फिरविली गेली... असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ७४ वर “शंभू राज्याभिषेक” या मथळ्याखाली लिहिले आ. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २९

भाग – २९
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
छत्रपती संभाजीराजे शाक्त व बौध्द धर्मीय राजे आहेत....!
राजारामाचे मंचकारोहण जर झाले...आणि संभाजीराजे यांचा जर बंदोबस्त केला नाही तर....संभाजीराजे आपल्याला जिवंत सोडणार नाहीत...यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वैदिक धर्म पंडित मोरोपंत पिंगळे – प्रधान,आण्णाजी दत्तो- सचिव,प्रल्हाद निराजी- न्यायधीश,राहुजी सोमनाथ यासारखे परशुरामाचे वंशज संभाजीराजांचा काटा काढण्यासाठी एकत्र आले होते.त्यांच्या नसानसातून संभाजींचा व्देष व तिरस्कार ओतप्रोत भरला होता.परंतु संभाजीराजे यांची ताकद,शौर्य,धाडस याबाबत त्यांना जाण होती.त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना कटात सामील करून घ्यायचे ठरविले होते.हंबीरराव मोहिते सोयराबाई यांचे सख्ख्ये भाऊ होते.त्यानुसार त्यांना सांगावा दिला की,तुमचा भाचा राजारामाचे मंचकारोहण केल्याची खुशखबर देण्यात आली...आणि त्याची गादी जर टिकवायची असेल तर संभाजीना संपविणे आवश्यक आहे... त्यासाठी आम्ही पन्हाळगडावर त्याला संपवायला निघालो आहे.तेव्हा तुम्ही आम्हाला सामील व्हा....हंबीरराव मुरब्बी सेनानी होते.त्यांनी तुमच्या स्वागताला कऱ्हाडला येत आहोत असे सांगितले.परशुरामाचे वंशज आनंदित झाले दुप्पट उत्साहाने वेगाने घोडे दौडवू लागले.परशुराम जयंतीच्या कुमुहूर्तावर परशुरामचे वंशज असुरवंशीय बळीराजाच्या वंशजाला संपविण्यासाठी निघाले.यावरून स्पष्ट असे दिसते की,वैदिक धर्म पंडितांचा धर्म आणि संभाजीराजे यांचा धर्म वेगवेगळा होता.त्यामुळे संभाजीराजे हिंदू धर्माचे नव्हते.....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ७० वर “परशुरामाचे वंशज पन्हाळ्याकडे” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.


भाग – ३०
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
संभाजीराजे यांना संपविण्यासाठी परशुराम जयंतीच्या कुमुहूर्तावर निघालेले परशुरामाचे वंशजांना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अटक करून युवराज संभाजीच्या समोर बेड्या ठोकून हजार केले.

 

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २८

भाग – २८
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
कटाचे सूत्रधार वेदिक धर्म पंडित आण्णाजी दत्तो आहेत.....!
.(मंचकारोहण स्वत: सोयराबाईनी राजारामाचे केलेले आहे.कोणताही वैदिक धर्म पंडित न घेता स्त्रीला मंचकारोहण करण्याचा अधिकार सनातन धर्मात आहे काय....?)
बळीराजा—महावीर—बुध्द—सम्राट अशोक यांचा वंशज छत्रपती शिवाजी महाराज कालकथित झालानंतर त्यांचे निर्वाण झाल्यानंतर रायगडावर प्रल्हाद निराजी – कारस्थानी राहुजी सोमनाथ आणि चिटणीस बालाजी आवजी हवालदार हिरोजी फर्जंद हेच प्रमुख कारभारी होते.राहुजीने तात्काळ निरोप पाठवून आण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांना बोलावून घेतले.सर्व कारस्थाण्यानी मसलत केली....युवराज संभाजीराजे जर राजसिहासनावर आरूढ झाला तर आपले काही खरे नाही.त्यांनी नऊ वर्षाच्या राजारामला गादीवर बसविण्याचे ठरविले...राजाराम अल्पवयीन असल्या कारणाने आपल्याला मनमानी कारभार करणे सोयीचे होईल असे वैदिक धर्म पंडितांना वाटत होते....राजारामाचा राज्यभिषेक करण्यास सोयराबाई यांनी विरोध केला....तेव्हा हे वैदिक धर्म पंडित सोयराबाई यांना म्हणाले की,तुम्ही आमचे ऐकले नाहीतर शिवरायांना विषप्रयोग करून तुम्हीच हत्या केली अशी बातमी सर्वत्र पसरवून तुमची बदनामी करू अशी धमकी देऊन नऊ वर्षाच्या राजारामाचे मंचकारोहण करण्यात आले....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ६९ वर “राजारामाचे मंचकारोहन” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत


बळीराजा—महावीर—बुध्द—सम्राट अशोक यांचा वंशज कालकथित झाला....! भाग – २७ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!


भाग – २७
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
बळीराजा—महावीर—बुध्द—सम्राट अशोक यांचा वंशज कालकथित झाला....!
वैदिक धर्म पंडितांनी सनातनी जातीय व्यावस्था टिकविण्यासाठी केलेल्या हत्यांचा इतिहास खूप मोठा साक्षीदार आहे.
राजेश खडके
अध्यक्ष वतन बचाओ आंदोलन
शहाजीराजे यांचे संकल्पनेतील स्वराज्य उभारण्यासाठी छत्रपती शिवरायांनी बालपणापासून अत्यंत कष्ट केले आहे.या स्वराज्याच्या पायाभरणीमध्ये सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे खूप मोठे मोलाचे योगदान आहे.शिवगंगा खोरे येथील(खेड शिवापूर) पासलकर वाड्याने खूप मोठे योगदान दिलेले आहे.या पासलकर वाड्याचे संरक्षण यल्ल्या मांग करीत होता.माता जिजाऊ आणि शिवराय कर्नाटक येथे युद्धाभ्यास करून सरसेनापती वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर - शेलार मामा यांचे बरोबर याच पासलकर वाड्यात येऊन राहिले होते...याच पासलकर वाड्यातून शहाजीराजे यांनी प्रचंडगडाचे राजे रायनाक परवारी यांचे नावे दिलेला स्वराज्य उभारणी संदर्भातील लखोटा वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर - शेलार मामा यांनी रायनाक परवारी यांचेकडे दिला....त्यांनी तो लखोटा वाचताच ”प्रचंडगड” स्वराज्याच्या स्वाधीन केला असल्याचे त्यांना सांगितले. प्रचंडगडावर स्वराज्याचे तोरण चढविण्यासाठी शिवराया बरोबर वीर बाजी पासलकर - नेताजी पालकर - शेलार मामा - यल्ल्या मांग - गणोजी शिर्के - झुंजारराव मरळ - हैबतराव शिळीमकर - शिंदे (शिखलकरी) - सपकाळ इत्यादी मावळे गेले होते.शिवराय प्रचंडगडावर येताच रायनाक परवारी यांनी स्वराज्यासाठी प्रचंडगड स्वाधीन केला...आणि शिवरायांनी यल्ल्या मांगाच्या हातून स्वराज्याचे पहिले भगवे निशाण प्रचंडगडावर उभे केले.स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून शिवरायांनी प्रचंडगडाचे तोरणगड असे नामकरण केले.त्यानंतर पासलकर वाड्यात येऊन आपल्या मावळ्या बरोबर स्वराज्याची पुढील योजना आखली (स्वराज्याची शपथ घेतली.) याच पासलकर वाड्यातून माता जिजाऊ आणि शिवरायांनी स्वराज्याचा राज्य कारभार सुरु केला.स्त्री सन्मान न राखणारा रांझाचा गुजर पाटील याचे हातपाय कलम करण्याचे पहिले शिक्षेचे फरमानाची मोहर याच पासलकर वाड्यातून देण्यात आली.याच पासलकर वाड्यातून स्वराज्याची पहिली राजधानी राजगड निर्माण करण्याचे कार्य सुरु झाले.त्यानंतर राजगडा वरून स्वराज्याचा कारभार सुरु झाला.शिवरायांनी २२ वर्ष या राजगडा वरून स्वराज्याचा कारभार पाहिला.संभाजीराजे यांनी शाक्त धर्म स्वीकारल्यानंतर......आणि शाक्त धर्म पद्धतीत झालेल्या दुसऱ्या राज्यभिषेका नंतर स्वराज्याचा विस्तार दक्षिणेत करावा यासाठी छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली होती.यावेळेस शिवरायांनी व सोयराबाईनी संभाजीराजेना दिलेल्या गुप्त सल्ल्यानुसार संभाजीराजे शृंगारपुर येथे त्यांचा विध्याभ्यास सुरु झाला होता.....धर्मशास्त्रावर चर्चा वादविवाद घडत होते.उमाजी पंडित – कवी कलश – गणेशभट जांभेकर – केशव उपाध्याय यांना वादविवादात निरुत्तर करीत होते.त्यांनी ब्रजभाषेत म्हणजे भोजपुरी भाषेत “नायिकाभेद” आणि “नखशिख” तसेच संस्कृत भाषेत “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहून त्यांनी वैदिक धर्म पंडितांनी त्यांच्या धर्मशास्त्रानुसार अठरा पगड जातींवर आणि बारा बलुतेदारावर सहा प्रकारच्या बंद्या घातल्या होत्या.त्या सर्व बंद्या मोडीत काडून वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी जातीय व्यावस्थेला हादरा दिला. शाक्त धर्माचे अनुयायी पिलाजी शिर्के यांच्या मुलाला आपली कन्या देऊन त्यांची कन्या सईबाई यांना आपली सून करून घेतले वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्माला त्यानी कधीही थारा दिला नाही.शाक्त धर्म स्वीकारून शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्यभिषेक करून घेतला.वैदिक धर्म पंडितांचा धर्म नाकारणाऱ्या संभाजीराजे यांची बदनामी करून त्यांना विषप्रयोगाने हत्या करण्याचा प्रयत्न याच वैदिक धर्म पंडितांनी केला होता.आपला राजा शाक्त व बौध्द धर्मीय असल्याने रयतेने वैदिक धर्म पंडितांच्या सनातनी धर्म पाळण्यास विरोध केला होता....त्यात संभाजीराजे शाक्त बौध्द धर्म पंडित झाले होते.ज्या वैदिक धर्म पंडितांनी आपला धर्म टिकविण्यासाठी शिवलिंग मंदिराचे पूजक समतावादी असुरवंशीय राजे यांची हत्या केली.ज्या संतानी वैदिक धर्म पंडितांनी धर्मा विरोधात मानव धर्म प्रस्थापित केला...त्या संताची हत्या या वैदिक धर्म पंडितांनी केली.ज्यांनी आपला धर्म प्रस्थापित करण्यासाठी बौध्द धर्मीय लाखो भिकुंची हत्या केली....असे वैदिक धर्म पंडित छत्रपती शिवाजी महराज आणि संभाजीराजे यांची हत्या करण्याच्या तयारीत होते.३ एप्रिल १६८० ची काळरात्र होती...छत्रपती शिवराय रात्री झोपायला गेले...पण दुसऱ्या दिवशी ते उठलेच नाही.शिवरायांचे आकस्मित निधन झाले...आकस्मित निधन म्हणजे...मृत्यूचे कारण दिसून येत नाही.शिवरायांच्या मृत्यूची बातमी रयतेला समजू नये..यासाठी रायगडाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते....त्याबाबतची काळजी वैदिक धर्म पंडितांनी घेतली होती.शिवरायांना मंत्राग्नी देण्याएवजी त्यांना भडाग्नी देण्यात आला....काही इतिहासकार यांचे म्हणणे आहे की,शिवरायांना विषप्रयोग करण्यात आला होता. विषप्रयोगाने त्यांचे शरीर काळे निळसर पडले होते हे रयतेने पाहिले....तर आपले काही खरे नाही.म्हणून शिवरायांची हत्या दडविण्याचे कार्य वैदिक धर्म पंडितांनी केले होते.जसे संत तुकाराम महाराज यांची हत्या करून त्यांना विष्णूच्या विमानाने जिवंत विमानातून वैकुंठात नेले अशी कहाणी तयार करण्यात आलेली आहे.वैकुंठ पाताळात आहे...पाताळात विमान कधीही जात नाही...तरीही आम्ही हे सत्य मानून आजही त्या वैदिक धर्म पंडितांची ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती म्हणून पूजा करीत आहोत......असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ६८ वर “युगांत” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २५

भाग – २५
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
नेताजी पालकर यांना स्वधर्मात घेऊन सनातनी व्यावस्थेला हादरा दिला.....!
स्वराज्यातील पहिला मावळा सरसेनापती वीर बाजी पासलकर आहेत....आणि नेताजी पालकर दुसरा क्रमांकाचा मावळा म्हटले तर वावगे ठरणार नाही.शिवरायांच्या बालपणापासून हे दोघेही त्यांचे बरोबर होते...शिवरायांना युद्धाभ्यास शिकविण्यास हे दोघेही अग्रेसर होते.स्वराज्याच्या पायाभरणीमध्ये या दोघांचा मोलाचा वाटा आहे.छत्रपती शिवरायांनी शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्यभिषेक केला त्यावेळेस सरसेनापती वीर बाजी पासलकर त्यांच्या बरोबर होते. नेताजी पालकर यांनी मुस्लीम धर्म स्विकारलेला होता असे काही इतिहासकार यांचे म्हणणे आहे.छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजयास निघाले होते.,,,तेव्हा त्यांनी नेताजी पालकर यांना स्वधर्मात घेतले तेव्हा सनातनी धर्म व्यावस्थेला याचा मोठा हादरा बसला.यावरून असे दिसते की,वैदिक धर्म पंडितांचा सनातनी धर्म आणि छत्रपती शिवराय – सरसेनापती वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर हे शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ६० वर “गदक्षिण दिग्विजय” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २४

भाग – २४
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
शाक्त धर्म पद्धतीत झालेल्या दुसऱ्या राज्यभिषेका नंतर स्वराज्याचा विस्तार दक्षिणेत करावा असा विचार शिवरायांनी केला.त्यांच्या इच्छेनुसार संभाजीराजे यांनी गोवा व तळकोकणावर स्वारी केली.त्यानंतर शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली.या मोहिमेत मोगलांच्या विरोधात एकजूट करायची असे त्यानी ठरविले होते.शत्रुणा मित्र बनवायचे व मित्रा बरोबर स्नेह बंध करायचे असा त्यांचा उद्देश होता.शहाजीराजे व त्यांचा मोठा भाऊ संभाजी यांनी निर्माण केलेल्या राज्याशी आणि सावत्र बंधू व्यंकोजी यांच्याशी स्नेहबंध घट्ट करायचे असा त्यांनी मनोदय ठरविला होता.सदरच्या मोहिमेत संभाजीराजे यांना बरोबर नेण्याचे गरजेचे होते...परंतु वैदिक धर्म पंडितांनी रायगडावरचे वातारवण दुषित केले होते...त्यामुळे दोघांनीही स्वराज्य सोडून जाणे धोक्याचे होते.संभाजीराजे रायगडावर थांबल्यास या वैदिक धर्मीय पाताळ यंत्र्याकडून त्यांना दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाहती...त्यामुळे शिवाराय – सोयराबाई – संभाजीराजे यांच्यात गुप्त मसलत झाली.रायगडाची जबाबदारी सोयराबाई यांचेवर सोपविण्यात आली...आणि संभाजीराजे यांनी शृंगारपुरास जाऊन कवी कलश आणि केशव पंडित यांचे बरोबर राहून विधाभ्यास करून वेळोवेळी रायगडाची खबरबात घेत राहावी असा गुप्त सल्ला देण्यात आला .....आणि छत्रपती शिवराय आपल्या विश्वासू सहकार्य बरोबर एकटेच दक्षिणेकडे निघाले....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ५९ वर “गुप्त सल्ला” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २३

भाग – २३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
हे पहा आले लबाड अमात्य....!
युवराज संभाजीराजे रयते बरोबर समतेने वागत होते.शुद्रातील शुद्र जातीतील पराक्रमी लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार नेमणुका देत होते.स्त्री सन्मान करीत होते..मंत्र्यांचा भ्रष्ट कारभार दरबारात जाहीरपणे उघड करीत होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे त्यांनी केलेल्या खोट्या तक्रारीवर कोणतीही दाखल न घेतल्यामुळे दरबारातील मंत्री वैदिक धर्म पंडित चिडले होते...त्यातील आण्णाजी दत्तो – प्रल्हादपंत – राहुजी सोमनाथ इत्यादी मंत्री अस्वस्थ झाले होते.त्यानी त्यांचे प्रमुख अस्त्र युवराज संभाजीराजे यांच्या विरोधात चालविण्याचे ठरविले....आणि ते म्हणजे “अफवा” संभाजीराजांची पद्धतशीर बदनामी सुरु केली. “संभाजी दुर्व्यहारी व व्यसनी आहे.” “तो मदिरा व मदिराक्षीचा गुलाम आहे”आणि तो आमावस्य व पौर्णिमेला स्मशानात जाऊन अघोरी कृत्य करतो...काही तर स्वत: डोळ्यांनी पाहिले असे सांगत होते...तर काही असे म्हणत की,विश्वसनीय सूत्राकडून सजले असे म्हणत होते.अशा अफवांचा बाजार पिकला होता....त्यामुळे पराक्रमी – बुद्धिमान – प्रजाहितदक्ष – शाक्त धर्मीय समतावादी संभाजीराजांची बदनामीमुळे शिवरायांच्या मनाला असंख्य वेदना होत होत्या...काहींनी संभाजीराजे यांचेवर विषप्रयोग केले होते.....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ५८ वर गोबेल्सचे “देशी पूर्वज” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.

लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....! भाग – २३

भाग – २३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
शाक्त धर्म पद्धतीत राज्यभिषेकामुळे दुखाविलेले धर्म पंडित पुन्हा डिवचले गेले.
दुसरा राज्यभिषेक झाल्यानंतर युवराज संभाजीराज्यांनी मुलकी कारभारात जातीने लक्ष घातले.राज्याभिषेकावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी वतनदार यांचेवर सिंहासन पट्टी लावली होती.त्यांनी सामान्य रयतेवर कोणताही कराचा बोजा टाकला नव्हता.जे अधिकारी वसुलीत ज्याद्ती करीत त्यांना ते कडक समज देत.कुळवाडीभूषण शिवरायांचे शेतकरी हिताचे धोरण ते राबवीत होते.युवराज संभाजीराजे यांच्या कर्तुत्व निष्ठा मुळे रयत सुखावली होती.अफरा तफर करणारे कारकून व सरकारकून यांना जरब बसली होती.मंत्र्याचा भ्रष्ट कारभार आणि वतनदार यांचा मनमानी कारभार थांबला गेला असल्याने तो दुखावला होता.मंत्री विरुध्द संभाजीराजे असा संघर्ष उभा राहिला...त्यांच्या खोट्या तक्रारी शिवारायाकडे सुरु झाल्या....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ५७ वर “रयतेचे युवराज” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.