Friday, 3 November 2017

भाग क्र.१० स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.१०
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
लाल महालातून माता जिजाऊचे मार्गदर्शनाखाली स्वराज्याचा कारभार सुरु....!
लाल महालाच्या संरक्षणासाठी होते.... झुंजारराव मरळ – दाभाडे – फिरंगोजी नरसाळा....!
पासलकर वाड्यात वर्षभर राज्यकारभार चालविल्यानंतर माता जिजाऊ १६४६ मध्ये लाल महालात आल्या.माता जिजाऊनी लाल महालातून १६५६ पर्यंत म्हणजे १० वर्ष राज्य कारभार पहिला.....माता जिजाऊ यांचे बरोबर झुंजारराव मरळ – दाभाडे – फिरंगोजी नरसाळा अशी प्रमुख लोक त्यांचे बरोबर होती.त्यानंतर राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून तेथून स्वराज्याचा कारभार सुरु केला होता.राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाली गावात माता जिजाऊ यांचेसाठी वाडा बांधण्यात आला होता.१६५६ साली माता जिजाऊ राजगडला आल्यानंतर लाल महाल पुन्हा झांबरे पाटलाच्या ताब्यात देण्यात आला.१६५६ पासून ते १६७४ पर्यंत माता जिजाऊ राजगडा जवळच होत्या.राजगडामधून राज्य कारभाराची सुरुवात झाली होती.

No comments:

Post a Comment