स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
स्वराज्याची शपथ.....पासलकर वाड्यात.....!
स्वराज्याचे पहिले तोरण....तोरणागडाचा पहिला गडकरीचा मान मिळाला यल्ल्या मांगाला....!
यलोजी बुवाचा....चांग भले...चांग भले.....चांग भले......!
तोरण चढविले नंतर वीर बाजी पासलकर आणि परवरी यांनी आपली विश्वासू लोक
तोरणागडावर ठेऊन ते सर्व शिवराया सोबत पासलकर वाड्यात आले.त्यांचे बरोबर
आता स्वराज्याची योजना आखण्यासाठी १२ मावळे बरोबर होते. वीर बाजी पासलकर
(शिवगंगा खोरे) - नेताजी पालकर (पाली-भोर) - शेलार मामा (बोरड – हिरडूस
मावळ) - यल्ल्या मांग (मांग दरी गुंजन मावळा) - गणोजी शिर्के (मोसे खोरे) -
रायनाक परवारी (प्रचंडगड – बारा गाव घेरे) -झुंजारराव मरळ (मुठे खोरे)
-हैबतराव शिळीमकर (गुंजन मावळा) - शिंदे (शिकेकरी) (गुंजन मावळा) - सपकाळ
(अठरा गाव मावळ) यांना बरोबर घेऊन पासलकर वाड्यातून स्वराज्याचा पहिला
राज्यकारभार सुरु केला.पासलकर वाड्याची सुरक्षतेची जबाबदारी अत्यंत
प्रामाणिकपणे यल्ल्या मांगाने पार पडल्यामुळे शिवरायांनी तोरणागडाची
जबाबदारी यल्ल्या मांगावर सोपविण्याचे ठरविले पहिला किल्लेदार म्हणून गडकरी
असल्याचा पहिला मान यल्ल्या मांगाला दिला.त्याने तोरणागडाच्या पायथ्याशी
पहिली बाजार पेठ उभी केली.आज त्या बाजार पेठेला यल्याची पेठ म्हणून ओळखले
जाते.पुढे त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत अनेक भिन्नता आहेत....मात्र आजही
तोरणागडाच्या प्रवेशव्दारा जवळ त्याची समाधी आहे. तोरणागडात प्रवेश करताना
आजही लोक “यलोजी बुवाचा....चांग भले” असे म्हणत प्रवेश करीत असतात.
No comments:
Post a Comment