Friday, 3 November 2017

भाग क्र.१ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.१
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!


गौतम बुध्द ते सम्राट अशोकापासून ते संत नामदेव महाराजा पासून ते संविधाना पर्यंत भगवा ध्वज आमचाच.......!
वेरूळ म्हणजे गौतम बुद्धांच्या लेण्यांचे साम्राज्य आणि वेरूळ हे मालोजी भोसल्यांचे होते.भारत देश (जम्बूद्वीप) हा नागवंशीय लोकांचा देश या देशात सिंधू संस्कृती नांदत होती पुढे या संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हटले गेले....आणि याचे पुरावे इतिहासात सापडतात.या वेरूळ मध्ये नाग राजा राणीची मूर्ती आहे.भोसले घराणे नागवंशीय असल्यामुळे या नाग राजा राणीचे दर्शन घेण्यासाठी निती नियमांनी जात असायचा.पूर्वीपासून भोसले घराणे हे शिवलिंग मंदिराचे आणि स्त्री शक्तीचे उपासक होते.त्या काळात ब्रह्मा विष्णू महेश आणि गणपती यांचे अस्तित्व दिसून येत नाही.सम्राट अशोकाने संपूर्ण भारतात बुध्द लेण्यांचे साम्राज्य उभे केले होते.सम्राट अशोकाची दोन मुले एक संघमित्रा आणि दुसरा महेंद्र यांनी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती कन्याकुमारी ते अफगाणिस्तान पर्यंत स्थापन केल्या होत्या.भारत देशामध्ये गौतम बुध्द आणि सम्राट अशोक यांनी संपूर्ण भारत भर भगवा ध्वज प्रचलित केला होता.संत नामदेव महाराज यांनी पंढरपूर येथे वारकरी सांप्रदाय निर्माण करून तेथील गौतम बुद्धांना “विठ्ठल” हे नाव देऊन वारकरी सांप्रदायाला “भगवा ध्वज” निशाण म्हणून दिले होते.त्यामुळे भगवा ध्वजाला भारतीय निवासी यांचे प्रतिक (निशाण) म्हणून मान्यता मिळालेली होती.त्यामुळे संत नामदेव महाराजांनी वारकरी सांप्रदाय यांचा लढा वैदिक धर्म पंडितांच्या विरोधात सुरु केला होता.संशोधक – इतिहासकार – लेखक या लढ्याला “वैदिक विरुध्द वारकरी” असे संबोधतात.संत एकनाथ महाराज सोडले तर सर्व संतानी हाच लढा केलेला आहे.संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे ही विठ्ठलपंत कुलकर्णी ह्या वैदिक ब्राह्मण आणि रुक्मिणी ही पिंपळ गाव येथील अस्पृश्य जावळे यांची मुलगी यांच्यापासून झालेली अपत्य होती.त्यामुळे वैदिक धर्म पंडितांनी त्यांना चांडाळ म्हणून घोषित केले.असे असताना संत नामदेव महाराज यांनी त्यांना तालीम देऊन समाजाच्या उत्कर्षासाठी तयार केले होते.आर्य आणि अनार्य असा संघर्ष पुरातन काळापासून सुरू झालेला आहे.अनार्य असणारे असुरवंशीय बळीराजा आणि आर्यांचा खूप मोठा संघर्ष झालेला आहे.बळीराजा हा भारतीय संस्कृतीचा संरक्षक होता....आणि याचा आर्यांनी घातपात केल्याचे मत आता सार्वजनिक मताने पुढे आलेले आहे

No comments:

Post a Comment