Friday, 3 November 2017

भाग क्र.४ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.४
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
माता जिजाऊ स्वराज्यात दाखल..शिवरायांचा जन्म झाला....!
आणि स्वराज्यावर आर्यांचा पहिला हल्ला झाला.....!
साल १६२२ मध्ये लखुजी जाधव यांची कन्या जिजाऊ यांचे बरोबर शहाजीराजे यांचे लग्न झाले... त्यांच्या लग्नात ब्राह्मण नव्हता हे मात्र निश्चित आहे.शहाजीराजे यांना पहिला मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी “संभाजी” ठेवले.शहाजीराजे साल १६२४ मध्ये आदिलशाहित सामील झाले.....लाल महाल बांधल्यामुळे निजामाच्या असे लक्षात आले होते की,शहाजीराजे स्वत:च्या राज्याची तयारी करीत आहे आणि हे सर्व तो समजवून घेत होता.शहाजीराजे यांना दुसरा मुलगा झाला त्याचे नाव त्यानी “जयसिंग” ठेवले.जेव्हा निजामच्या शहाजीराजे यांची चाल लक्षात आली....तेव्हा त्यांनी त्यांचा ब्राह्मण सरदार “मुरार जगदेव” याला लाल महालावर हल्ला करण्याचे आदेश दिले होते.स्वराज्याचा दिवस उगविला शहाजीराजे यांना तिसरा मुलगा झाला त्याचे नाव “शिवाजी” ठेवण्यात आले....म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्ल्यावर १९ फ्रेब्रुवारी १६३० मध्ये जन्म झाला.२ मार्च १६३० चा दिवस उगवला स्वराज्याचा पहिला विरोधक वैदिक धर्म पंडित निजामाचा सरदार “मुरार जगदेव” याने पुणे परगण्यात असणाऱ्या लाल महालावर पहिला हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म होऊन जेमतेम १०-१२ दिवस झाले असतील.....आणि वैदिक धर्म पंडिताचा हल्ला झाला.त्यावेळी शहाजीराजे कर्नाटक येथील बेगलोर मध्ये होते.लाल महालावर पहिला वैदिक धर्म पंडित ताबा मारून बसला त्याने पुणे बेचीराग करून टाकले.....साल १६३० ते १६३६ पर्यंत लाल महालावर ब्राह्मण “मुरार जगदेव” थांड मारून बसला होता.हल्ला झाल्यावर झांबरे पाटलाने सुपा परगणा गाठला.

No comments:

Post a Comment