Friday, 3 November 2017

भाग क्र.७ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.७
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
प्रचंडगडाचे गडकरी....परवारी स्वराज्यात दाखल........!
प्रचंडगड स्वराज्याच्या ताब्यात.....यल्ल्या मांगाच्या हातून चढविले पहिले तोरण “तोरणगड”
साल १६४३ – १६४४ दरम्यान पासलकर वाड्यात आलेनंतर तेथे शिवरायांची मांग दरीतील यल्ल्या मांग याच्या बरोबर ओळख झाली.यल्ल्या मांग याचेकडे पासलकर वाड्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी होती.ठरल्याप्रमाणे बाल शिवराय आणि वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा – यल्ल्या मांग हे प्रंचडगडा जवळ गेले.शिवराय शेलारमामा आणि यल्ल्या मांगाला बरोबर घेऊन गडाच्या खालीच थांबले. वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर लखोटा घेऊन प्रचंडगडाच्या गडकरी असणारे परवारी यांचेकडे गेले.शहाजीराजे यांचा लखोटा त्यांनी त्यांच्याकडे दिला....त्यांनी स्वराज्यासाठी गड स्वाधीन केल्याचे जाहीर केले.शिवरायांना निरोप देण्यात आला.शिवराय शेलारमामा आणि यल्ल्या मांगाला बरोबर घेऊन गडावर गेले अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने प्रचंडगडाचा ताबा घेतला आणि स्वराज्याचे पहिले भगवे निशाण यल्ल्या मांगाच्या हातुन चढवून घेतले.स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून प्रचंडगडाचे नामकरण “तोरणागड” असे केले.

No comments:

Post a Comment