Friday, 3 November 2017

भाग क्र.६ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.६
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
शहाजीराजे यांनी शिवरायांच्या हातात दिले स्वराज्याचे भगवे निशाण....!
स्वराज्यात पासलकर वाड्याचे महत्वाचे योगदान........!
आता स्वराज्य स्थापनेची वेळ आली होती प्रचंडगडाचे गडकरी परवारी यांचे भोसले घराण्याचे सलोख्याचे संबध असल्यामुळे स्वराज्याच्या संकल्पने संदर्भात शहाजीराजे आणि परवारी यांचे एकमत झाले होते.शहाजीराजे यांनी ठरल्याप्रमाणे....परवारी यांचे नावाने लखोटा तयार करून तो वीर बाजी पासलकर यांच्याकडे दिला. गौतम बुध्दापासून ते संत नामदेव महाराज यांचेपर्यंत भगवे निशाण चालत आले होते.१२ ते १५ व्या शतकापर्यंत म्हणजे संत नामदेव महाराजा नंतर भगव्या निशाणाला मरगळ आली होती.नामदेव महाराजांची विचारधारा सर्वत्र प्रचलित झाली होती.म्हणूनच भगवे निशाण पुन्हा एकदा स्वराज्याचा भगवा ध्वज म्हणून शिवरायांच्या हातामध्ये दिला.माता जिजाऊ – बाल शिवराय – वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा यांना पुणे येथील शिवगंगा खोरे (खेड शिवापूर) पासलकर वाड्यामध्ये पाठविले.

No comments:

Post a Comment