Wednesday, 29 November 2017

छत्रपती संभाजीराजांच्या हत्येच्या कटात वैदिक धर्म पंडितांचे रजपूत मराठे......! छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या बदल्याची तारीख १ जानेवारी १८१८ इतिहासात नोंद झाली.





आतापर्यंत बरेच इतिहासकार आणि संशोधकांनी केलेले संशोधन पाहिले त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचली त्यातील जर कोणाचे कौतूक करावेसे वाटले तर लेखक चंद्रशेखर शिखरे यांचेच करावे असे मला एक विश्लेषक म्हणून वाटत आहे.त्याचे कारण असे आहे की,छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कशी झाली यावर त्यांनी संशोधन करून छत्रपती संभाजीराजांची संघर्ष गाथा (चित्रमय) हे पुस्तक जिजाऊ प्रकाशन यांचे वतीने प्रकाशित केले आहे.त्यांच्या त्या लिखाणावरून स्वराज्यात तीन प्रकारचे “मराठा” आढळून येतात.एक जो छत्रपती शिवाजी महाराज यांचे बरोबर प्रामाणिक स्वराज्यात होता.तो मराठा “जगदंब”ला मानतो.....आणि शिवराय नेहमी “जगदंब”च म्हणायचे त्यांनी “भवानी” हा शब्द कधीही उच्चारला नाही......आणि दुसरा होता तो “रजपूत मराठा” याने कधीही शिवरायांना आपले मानले नाही....नेहमी त्यांच्या विरोधातील कारवाया मध्ये सहभागी असायचा आणि हा “रजपूत मराठा” वैदिक धर्म पंडितांचा मानसिक गुलाम होता व आहे....हा “भवानी”ला मानणारा समाज आहे.जी “भवानी” जिने छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षात दुष्टांत देऊन शत्रूचा नाश करण्यासाठी तलवार दिली असे वैदिक धर्म पंडितांचे म्हणणे आहे.त्यांच्या सांगण्यावरून सत्य मानणारा आणि ते जे सांगतील ते तो करणारा मराठा म्हणजे  “रजपूत मराठा” होय.आणि हा रजपूत मराठा मरेपर्यंत बामनाना कधी सोडत नाही...ते वैदिक धर्म पंडितांना आपल्या जीवनाचा शिल्पकार मानीत असतात.वैदिक धर्म पंडितांनी याच “रजपूत मराठा” यांचे माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या करून.....त्यांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिले नाही.याच “रजपूत मराठा” यांच्या हातून प्रामाणिक मराठा सरदार यांच्या हत्या घडविल्या.....जे सापडले त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी दिले.काहींचा कडेलोट केला तर काहीना सुळावर चढविले.अशा संभाजीराजांना या “रजपूत मराठा” सरदार यांनी वैदिक धर्म पंडिता बरोबर राहून औरंगजेबाच्या सरदाराकडून पकडून दिले.हेच “रजपूत मराठा” वैदिक धर्म पंडित यांचे बरोबर होता......म्हणून त्यांना संभाजीराजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देता आली.त्यांना जो वाचवयाला जाणार त्यांचे शीर हेच “रजपूत मराठे” अलग करीत असे....वढू येथे संभाजीराजांना वाचविण्यासाठी पाच “मराठी सरदार” (धनगर) यांनी हल्ला केला असता,याच “रजपूत मराठा” यांनी त्यांचे शीर धडापासून अलग केले.
   या “रजपूत मराठा” सरदार आणि वैदिक धर्म पंडितांना माहित होते की,संभाजीराजे संपले की,स्वराज्य वाचवायला कोणी राहणार नाही.....परंतु त्याला जर संपवायचे असेल तर स्वराज्य संपले पाहिजे.असा मनसुबा त्यांनी त्यांचे डोळ्या समोर ठेऊन पूर्वनियोजित कटकारस्थान केले होते.त्याप्रमाणे त्यानी छत्रपती संभाजी महाराज यांची ३८ दिवस धिंड काढून स्वराज्यात मोठी दहशत या “रजपूत मराठा” यांनी केली होती.अशा वैदिक धर्मीय “रजपूत मराठा” यांना न घाबरता छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे गोळा करून ते शिवून त्यांचा अंत्यसंस्कार महार समाजाने केला होता.....त्यानंतर औरंगाजेब पश्चातापाच्या खाईत खोलवर रुतत गेला..आणि त्याने पुन्हा कधीही हल्ला स्वराज्यावर केला नाही....कारण आता स्वराज्य संपले होते.औरंगाजेबाला कधीही स्वराज्य जिंकता आले नाही....अखेर त्याने मृत्यूला कवटाळून घेतले.वैदिक धर्म पंडितांचे कटकारस्थान “रजपूत मराठा” यांनी पूर्ण केले.लाल महालावर ताबा मारून बसलेला पेशवा आता या “रजपूत मराठा” यांचा राजा झाला होता......आणि राहिले साहिलेले स्वराज्याचे मराठे या पेशव्याने संपविण्याचे कार्य सुरु केले....त्यामध्ये प्रमुख मराठा सरदार स्वराज्याचा पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या वंशजाना या पेशव्याने शिवगंगा खोऱ्यातील वतन काढून घेऊन त्यांना मोसे खोऱ्यात हाकलून दिले.स्वराज्याचे पहिले तोरण चढविणाऱ्या मांगदरीतील  यल्ल्या मांगाच्या वंशजाना “रजपूत मराठा” बनवून त्यांना मांगडे केले.जीवा महाराला “महाले” करून महार समाजातील अस्तित्व संपविण्याचा घाट घातला.अशा बऱ्याच घटना घडविल्या गेल्या आहेत...यातील इतिहासातील महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे ज्या शहाजीराजे यांनी १६१६ मध्ये “निसबत मुंजेरी” म्हणजे पुण्यामध्ये लाल महाल बांधला....आणि “नागरवास” गावामध्ये हत्तीच्या वजनाची तुळा करून तेवढे वजना एवढे सोने चांदी धन धान्य गोरगरीब लोकामध्ये वाटून स्वराज्य संकल्पित करून त्या गावचे नाव “तुळापुर” असे नामकरण झाले.त्याच तुळापुर मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करून स्वराज्य संपविले.आणि दुसरी महत्वाची घटना म्हणजे शहाजीराजे यांचे संकल्पित स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले.स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला....त्याचा सन्मान म्हणून त्याची कबर बांधून दिवाबत्तीची सोय केले.....आजपर्यंत ती दिवाबत्ती त्या प्रतापगड पायथ्याशी जळत आहे.मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेला अंत्यदर्शन नहोऊ दिले नाही....संभाजीराजांनी बांधलेली समाधी या वैदिक धर्म पंडितांच्या “रजपूत मराठा” यांनी उध्वस्त करून ती झाकून टाकून त्यांचा इतिहास बुजविला होता....कोणालही त्या समाधी जवळ जाण्याची मुभा नव्हती.हळू हळू छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे समतावादी स्वराज्य संपविण्यासाठी वीर “मराठी सरदार” महार समाजाला गावापासून दूर करण्याचे कटकारस्थान जोरात सुरु झाले....पराकोटीचा जातीवाद सुरु झाला.या वैदिक धर्म पंडितांनी “रजपूत मराठा” यांच्या माध्यमातून त्यांचेवर अन्याय अत्याचार जोरात सुरु केले.स्वत:चे या समाजावर अधिष्टान निर्माण करण्यासाठी गणपती नावाचा मोदक खाणारा गणपती याचे आठ मंदिर या पेशव्याने निर्माण केले होते.परंतु “मराठी सरदार” यांच्या मनात स्वराज्य खेळत होते.आता साताऱ्यातून स्वराज्याची धुरा सुरु होती....आणि पुण्यातून म्हणजे शनिवार वाड्यातून स्वराज्य धुरा संपविण्याचे कार्य सुरु होते.
   छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी दुर्लक्षित झाली होती.परंतु छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या आजही “मराठी सरदार” यांच्या मनात सलसलत होती.भोरचे महार सरदार सिद्धनाक महार सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज यांचे ते “मराठी सरदार” होते.पेशव्याने स्वत:ची “टाकसाळ”(चलन) सुरु केली होती.याची खबर छत्रपती शाहू महाराज यांना झाली होती.त्यांनी सरदार सिद्धनाक महार यांना बोलावून घेतले होते....आणि त्यांना सांगितले की,आता पेशवाई संपवायची वेळ आहे....स्वराज्य बुडव्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.पेशवाई संपवून ती स्वराज्यात जोडून घे. छत्रपती शाहू महाराज यांचे आदेशावरून सरदार सिद्धनाक महार याने स्वत:चे निवडक असे २५० (अडीचशे) लोकांना प्रत्येकी १०० ठोकळ गडी घेऊन भीमा कोरेगाव याठिकाणी येण्याचे सांगितले.याची खबर ब्रिटीश सरकारला झाली होती.....त्यानी पेशवाईवर चढाई करण्याचे ठरविले होते....तेही त्याठिकाणी आले.अडीचशे लोकांचे प्रत्येकी शंभर गडी म्हणजे पंचवीस हजार लोक सरदार सिद्धनाक महार घेऊन आला होता.त्या ब्रिटीश सैन्यामध्ये ५०० महार सैनिक होते.त्यांना आपले भाऊबंध स्वराज्याचा विरोधक पेशवा याचे विरोधात लढण्यासाठी आलेला पाहून तेही पेशव्याच्या विरोधात लढण्यासाठी सरदार सिद्धनाक महार याच्या नेतुत्वात सामील झाले. पेशवा “मराठी सरदार” यांच्या विरोधात लढण्यासाठी “रजपूत मराठा” यांना घेऊन भीमा  कोरेगाव याठिकाणी आला होता.जेथे छत्रपती संभाजी महाराज यांची धिंड काढून हत्या करण्यात आली होती.तेव्हा उघड्या डोळ्यांनी संभाजीच्या हत्येचा खेळ हा “रजपूत मराठा” पाहत आनंद घेत होता आज पेशवाईला वाचविण्यासाठी हाच “रजपूत मराठा” लढण्यासाठी समोर आला होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्तेचा बदला घेण्याची वेळ आली होती.पंचवीस हजार पाचशे महार योद्धे पेशवाईच्या “रजपूत मराठा” सरदार यांचेवर तुटून पडली होती.हा हा म्हणत प्रत्येक महार योद्धा त्या “रजपूत मराठा” सरदारचे मुंडके शरीरापासून दूर करीत होती. छत्रपती संभाजी महारांच्या रक्ताने माखलेली नदी “रजपूत मराठा” सरदारांच्या रक्ताने धुवून निघत होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्तेचा घेतलेला बदला त्या वीर मराठी सरदार यांना आनंद देत होती...जस जसे या “रजपूत मराठा” सरदारांचे ध्येय आडवे होऊ लागले तसतसे स्वराज्याची माती सुखी होऊ लागली होती. भीमा कोरेगावची लढाई पेशवे हरल्याची बातमी शनिवार वाड्यावर धडकली ....आता स्वराज्याचा भगवा पुन्हा लाल महालावर चढविला जाणार होता.परंतु लाल महालाचा झालेला शनिवार वाडा सरदार सिद्धनाक महार या मराठी सरदारच्या हातात पेशव्याला द्यायचा नव्हता.....कारण तो पुन्हा लाल महाल झाला असता...! म्हणून शनिवार----याने जाळून टाकला आणि नातू याने ब्रिटीश जॅक शनिवार वाड्यावर चढवून तो ब्रिटीशांच्या ताब्यात देऊन पेशव्याने ब्रिटिशा समोर शरणागती पतकरली.छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या बदल्याची तारीख १ जानेवारी १८१८ इतिहासात नोंद झाली.

Monday, 6 November 2017

संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळे इतिहासातून गायब.....सर्वत्र आनंदोत्सव साजरा....! छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” नावाची बाबच विसरलेलो आहे काय...?



 
जेम्स लेन नावाचा एक विदेशी लेखक होता,,,,त्याने “द हिंदू किंग इस्लामिक इंडिया” नावाचे एक पुस्तक लिहिले होते.या पुस्तकामध्ये माता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांचे बदनामीकारक लिखाण केले होते....लिखाण इतक्या खालच्या पातळीवर झाले होते की,जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला त्याचा संताप येणारच....आजच्या बोली भाषेत म्हणायचे झाले तर आपल्याला नुसते कोणी “तुझ्या आईला” असे म्हटले तरी प्रत्येक व्यक्तीचे मस्तक हलल्या शिवाय रहात नाही....आणि माता जिजाऊ तर स्वराज्याच्या माता होत्या…..त्यांच्या बदनामीचा राग तर प्रत्येकाला येणारच.....! विषय असा आहे की,भारतीय निवासी यांचेवर या ब्राह्मणी व्यवस्थेने पूर्वीपासून हल्ला केला आहे...त्रास दिलेला आहे.सामान्य जनता कुटुंबाच्या चौकटीतून बाहेर यायला तयार नाही.त्यांना स्वत:च्या आत्मबलावर विश्वास राहिलेला नाही.त्याने आपले जीवन तेहतीस कोटी देवांच्या हातामध्ये दिलेले आहे...त्या तेहतीस कोटी देवांच्या नावावर सर्व सामान्यांना वेड्यात काडून भरकटायला लावणारी ब्राह्मणी व्यावस्थेवर विश्वास ठेऊन आपल्या जन्म दिलेल्या आई पेक्षा तो अशा भुरट्या बामनावर विश्वास ठेऊन आपल्या जीवनाचे बलिदान करीत असतो.अश्या ब्राहमणी व्यावस्थेने असुरवंशीय बळीराजापासून ते गौतम बुद्धापासून ते छत्रपती संभाजी महाराज यांचे पर्यंत हत्या घडविलेल्या आहेत....आणि हत्या केल्या आहेत.महापुरुषांची बदनामी करणे हे त्यांचे “ब्रह्म अस्त्र” आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर याच अस्त्राचा भयानक वापर करून त्यांनी त्यांचे कर्तुत्व संपविण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्यावर याच मनुवादी विचारांनी तीन वेळा विषप्रयोग केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी विषप्रयोग करून हत्या केली अशा लोकांना संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन काहींचा कडेलोट करून तर काहीना सुळावर चढवून शिक्षा दिली.मात्र याच लोकांच्या वंशजानी मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले.अशा लोकांचे अधिष्टान असणारा मोदक खाणारा गणपती आपला पूजक करून प्रत्येकाच्या घराच्या देवाऱ्यात नेऊन बसविला आहे.मग तो टिळकांचा असो किंवा भाऊ रंगारीचा असो......शेवटी संभाजी ब्रिगेडच्या सामजिक संघटनेचा पक्ष झालेल्या लोकांनी तुम्हा आम्हाला “सुखकर्ता आणि दुख:हर्ता” म्हणायला लावले आहे.ज्या गणपतीने स्वराज्य संपविले तुमच्या आमच्या पासून माता जिजाऊ – छत्रपती शिवाजी महाराज – संभाजी महाराज दूर केले.त्यांनाच आज आपण ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती म्हणून पुजत आलेलो आहे.सत्यनारायण महापूजा करून आपले जीवनातील स्वराज्यातील अस्तित्व आपण संपवीत आहोत.असे का घडले आहे...? आणि असे का घडत आहे...? याचा विचार कोणी करीत नाही.आपण “बलिदान” नावाची बाबच का विसरलो आहे...? हे मला आज कळायला मार्ग नाही.मी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला तो आत्मसात केला तेव्हा मला अक्षरशः रडू कोसळले.....माझे मन हेलावून गेले.त्याचे तसे कारणही आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” विसरलेलो आहे.शहाजीराजे यांनी पुणे प्रांतातील “नांगरवास” या गावी हत्तीच्या वजनाची तुळा करून त्याच्या वजना एवढे सोने चांदी गोरगरीब दुष्काळग्रस्त रयतेसाठी देऊन त्यांना मदत केली....आणि  तुळा केलेवरून याच “नांगरवास” गावाचे “तुळापुर” असे नामकरण झाले.आणि याच तुळापुरमध्ये शहाजीराजांनी स्वराज्य संकल्पित केले.त्यामुळे खरी स्वराज्यची पायाभरणी शहाजीराजांनी याच तुळापुर मध्ये केली होती...परंतु ब्राह्मणी व्यावस्थेने मुगल सरदार “मुरार जगदेव” या धर्म पंडिताने हत्तीच्या वजनाची तुळा केली असल्याचे जाहीर केलेले आहे.जर हा मुरार जगदेव एवढा रयतप्रिय होता.तर त्याने लाल महालावर हल्ला करून पुणे प्रांत बेचीराग कसा काय केला असा माझा प्रश्न आहे.त्यामुळे शहाजीराजे आणि स्वराज्याचा काहीही संबध येत नाही.शहाजीराजे मोघलांचेच फक्त मांडलिक कसे होते हे दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.लाल महाल आणि दादोजी कोंडदेव यांचा कोणताही संबध नसताना पुणे महानगरपालीकेच्या वतीने बनावट उभा केलेल्या लाल महालामध्ये दादोजी कोंडदेव बनावट उभा करून माता जिजाऊची बदनामी करण्यासाठीच हा प्रकार केल्याचे इतिहासकार व संशोधक यांच्या समोर आले होते.याचाच फायदा घेऊन भांडारकर इतिहास संशोधन मंडळातील बारा धर्म वैदिक पंडितांनी अशी माहिती पुरविली की,दादोजी कोंडदेव हा छत्रपती शिवराय यांच्या कुटुंबातील अविभाज्य घटक आहे....आणि त्या लेखकाने तसे लिखाण त्याचे पुस्तक “द हिंदू किंग इस्लामिक इंडिया” यामध्ये केले आहे.आता हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे त्यामुळे सामान्य लोकांना ते लवकर समजणार नव्हते.छत्रपती संभाजी महाराज यांचेवर मनुवादी बामनानी केलेले अत्याचार आणि त्यांची औरंगाजेबाच्या माध्यमातून केलेली अमानुष हत्या त्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर यांनी काही तरुण उभे करून तुळापुर येथील संभाजी महाराज यांचे समाधीला साक्ष ठेऊन “संभाजी ब्रिगेड” या नावाची संघटनेची स्थापन केली.याच संघटनेच्या ७२ कार्यकर्त्यानी भांडारकर इतिहास संशोधन मंडळावर हल्ला करून अशा बनावट इतिहासाची तोडफोड केली...त्या ७२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी तोडफोड केल्याप्रकरणी अटक केली.ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली गेली.सदर विषयावर खूप मोठा उहापोह झाला त्या बारा बामनावर कारवाई करून सदरच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली जनता कारवाई होण्याची वाट पहात होती. “संभाजी ब्रिगेड” च्या त्या ७२ कार्यकत्यांना आता लोक मावळे म्हणू लागली....त्यांची नोंद इतिहासाच्या पानामध्ये झाली.त्यानंतर सर्व ७२ मावळे जामिनावर बाहेर आले न्यायालयाच्या पायऱ्या चढणे उतरणे सुरु झाले.संभाजीराजांच्या छाव्यांनी दादोजी कोंडदेव या बनावट वैदिक धर्म पंडितांचा पुतळा लाल महालातून बाहेर काढून टाकला.आता वैदिक धर्म पंडित मुक्त लाल महाल झाला होता....आता खरा लाल महाल शोधण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.आताचा शनिवार वाडा पूर्वीचा लाल महाल होता असे पुरावे बाहेर येऊ लागले होते.शनिवार वाड्याला लाल महाल घोषित करा अशी मागणी पुढे येऊ लागली. भांडारकर इतिहास संशोधन मंडळावर झालेल्या हल्लेचा निकाल जाहीर झाला आणि संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांची निर्दोष सुटका करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.सर्वत्र आनंदोत्सव उत्सव साजरी करण्यात आला.परंतु हा आनंदोत्सव साजरी करण्याचा विषय नाही असे मला वाटते.त्याचे कारण असे की,जर यांची निर्दोष सुटका झाली असे म्हटले तर त्या बारा वैदिक धर्म पंडितावर कारवाई झाली पाहिजे होती.त्याची इतिहासात नोंद होणे आवश्यक होते....परंतु तसे झाले नाही.त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांची निर्दोष सुटका होणे हा खरा इतिहास बुजविण्याचे कार्य झाले असल्याचे माझे स्पष्ट मत आहे.याचा अर्थ स्पष्ट असा आहे की,या ७२ मावळ्यांचे कार्य वाया गेले असल्याचे माझे मत आहे.जर या मावळ्यांना जर न्यायालयाने शिक्षा सुनाविली असती...तर त्याची इतिहासात नोंद झाली असती.परंतु निर्दोष मुक्तता म्हणजे त्या संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळे इतिहासातून गायब होणे असा आहे.त्यामुळे अशा प्रकारचा सर्वत्र आनंदोत्सव साजरा करणे ही आनंदाची बाब नाही.म्हणून मी म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपासून...आपण “बलिदान” नावाची बाबच विसरलेलो आहे.

Friday, 3 November 2017

भाग क्र.१० स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.१०
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
लाल महालातून माता जिजाऊचे मार्गदर्शनाखाली स्वराज्याचा कारभार सुरु....!
लाल महालाच्या संरक्षणासाठी होते.... झुंजारराव मरळ – दाभाडे – फिरंगोजी नरसाळा....!
पासलकर वाड्यात वर्षभर राज्यकारभार चालविल्यानंतर माता जिजाऊ १६४६ मध्ये लाल महालात आल्या.माता जिजाऊनी लाल महालातून १६५६ पर्यंत म्हणजे १० वर्ष राज्य कारभार पहिला.....माता जिजाऊ यांचे बरोबर झुंजारराव मरळ – दाभाडे – फिरंगोजी नरसाळा अशी प्रमुख लोक त्यांचे बरोबर होती.त्यानंतर राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून तेथून स्वराज्याचा कारभार सुरु केला होता.राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाली गावात माता जिजाऊ यांचेसाठी वाडा बांधण्यात आला होता.१६५६ साली माता जिजाऊ राजगडला आल्यानंतर लाल महाल पुन्हा झांबरे पाटलाच्या ताब्यात देण्यात आला.१६५६ पासून ते १६७४ पर्यंत माता जिजाऊ राजगडा जवळच होत्या.राजगडामधून राज्य कारभाराची सुरुवात झाली होती.

भाग क्र.९ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.९
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
स्वराज्यातील पहिले शिक्षेचे फर्मान...पासलकर वाड्याला अगण्य महत्व........!
रांझाच्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा केला चौरंगा....!
आता शिवरायांनी स्वराज्याचा पहिला कारभार माता जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली पासलकर वाड्यातून सुरु केला.तेव्हा राझांच्या गुजर पाटलाची कुणबी स्त्रीला बेइज्जत केल्याप्रकरणी शिवरायांकडे पहिले प्रकरण न्याय निवाडा करण्यासाठी आले.याच पासलकर वाड्यातून शिवरायांनी त्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा चौरंगा करण्याचे पहिल्या शिक्षेचे फर्मान देऊन स्त्री जातीचा सन्मान हे स्वराज्य करेल असा निरोप सर्वच पाटील आणि सरंमजामशहा यांना देण्यात आला.आता तरी जातीला आपले संरक्षण करणारे स्वराज्य आल्यासारखे वाटू लागले.त्यामुळे स्वराज्यात पासलकर घराण्याला खूप मोठे महत्व प्राप्त होते.पासलकर वाड्यात वर्षभर राज्यकारभार माता जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली चालविला

भाग क्र.८ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.८
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
स्वराज्याची शपथ.....पासलकर वाड्यात.....!
स्वराज्याचे पहिले तोरण....तोरणागडाचा पहिला गडकरीचा मान मिळाला यल्ल्या मांगाला....!
यलोजी बुवाचा....चांग भले...चांग भले.....चांग भले......!
तोरण चढविले नंतर वीर बाजी पासलकर आणि परवरी यांनी आपली विश्वासू लोक तोरणागडावर ठेऊन ते सर्व शिवराया सोबत पासलकर वाड्यात आले.त्यांचे बरोबर आता स्वराज्याची योजना आखण्यासाठी १२ मावळे बरोबर होते. वीर बाजी पासलकर (शिवगंगा खोरे) - नेताजी पालकर (पाली-भोर) - शेलार मामा (बोरड – हिरडूस मावळ) - यल्ल्या मांग (मांग दरी गुंजन मावळा) - गणोजी शिर्के (मोसे खोरे) - रायनाक परवारी (प्रचंडगड – बारा गाव घेरे) -झुंजारराव मरळ (मुठे खोरे) -हैबतराव शिळीमकर (गुंजन मावळा) - शिंदे (शिकेकरी) (गुंजन मावळा) - सपकाळ (अठरा गाव मावळ) यांना बरोबर घेऊन पासलकर वाड्यातून स्वराज्याचा पहिला राज्यकारभार सुरु केला.पासलकर वाड्याची सुरक्षतेची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे यल्ल्या मांगाने पार पडल्यामुळे शिवरायांनी तोरणागडाची जबाबदारी यल्ल्या मांगावर सोपविण्याचे ठरविले पहिला किल्लेदार म्हणून गडकरी असल्याचा पहिला मान यल्ल्या मांगाला दिला.त्याने तोरणागडाच्या पायथ्याशी पहिली बाजार पेठ उभी केली.आज त्या बाजार पेठेला यल्याची पेठ म्हणून ओळखले जाते.पुढे त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत अनेक भिन्नता आहेत....मात्र आजही तोरणागडाच्या प्रवेशव्दारा जवळ त्याची समाधी आहे. तोरणागडात प्रवेश करताना आजही लोक “यलोजी बुवाचा....चांग भले” असे म्हणत प्रवेश करीत असतात.

भाग क्र.७ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.७
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
प्रचंडगडाचे गडकरी....परवारी स्वराज्यात दाखल........!
प्रचंडगड स्वराज्याच्या ताब्यात.....यल्ल्या मांगाच्या हातून चढविले पहिले तोरण “तोरणगड”
साल १६४३ – १६४४ दरम्यान पासलकर वाड्यात आलेनंतर तेथे शिवरायांची मांग दरीतील यल्ल्या मांग याच्या बरोबर ओळख झाली.यल्ल्या मांग याचेकडे पासलकर वाड्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी होती.ठरल्याप्रमाणे बाल शिवराय आणि वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा – यल्ल्या मांग हे प्रंचडगडा जवळ गेले.शिवराय शेलारमामा आणि यल्ल्या मांगाला बरोबर घेऊन गडाच्या खालीच थांबले. वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर लखोटा घेऊन प्रचंडगडाच्या गडकरी असणारे परवारी यांचेकडे गेले.शहाजीराजे यांचा लखोटा त्यांनी त्यांच्याकडे दिला....त्यांनी स्वराज्यासाठी गड स्वाधीन केल्याचे जाहीर केले.शिवरायांना निरोप देण्यात आला.शिवराय शेलारमामा आणि यल्ल्या मांगाला बरोबर घेऊन गडावर गेले अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने प्रचंडगडाचा ताबा घेतला आणि स्वराज्याचे पहिले भगवे निशाण यल्ल्या मांगाच्या हातुन चढवून घेतले.स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून प्रचंडगडाचे नामकरण “तोरणागड” असे केले.

भाग क्र.६ स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!

भाग क्र.६
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
शहाजीराजे यांनी शिवरायांच्या हातात दिले स्वराज्याचे भगवे निशाण....!
स्वराज्यात पासलकर वाड्याचे महत्वाचे योगदान........!
आता स्वराज्य स्थापनेची वेळ आली होती प्रचंडगडाचे गडकरी परवारी यांचे भोसले घराण्याचे सलोख्याचे संबध असल्यामुळे स्वराज्याच्या संकल्पने संदर्भात शहाजीराजे आणि परवारी यांचे एकमत झाले होते.शहाजीराजे यांनी ठरल्याप्रमाणे....परवारी यांचे नावाने लखोटा तयार करून तो वीर बाजी पासलकर यांच्याकडे दिला. गौतम बुध्दापासून ते संत नामदेव महाराज यांचेपर्यंत भगवे निशाण चालत आले होते.१२ ते १५ व्या शतकापर्यंत म्हणजे संत नामदेव महाराजा नंतर भगव्या निशाणाला मरगळ आली होती.नामदेव महाराजांची विचारधारा सर्वत्र प्रचलित झाली होती.म्हणूनच भगवे निशाण पुन्हा एकदा स्वराज्याचा भगवा ध्वज म्हणून शिवरायांच्या हातामध्ये दिला.माता जिजाऊ – बाल शिवराय – वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा यांना पुणे येथील शिवगंगा खोरे (खेड शिवापूर) पासलकर वाड्यामध्ये पाठविले.