Tuesday, 27 June 2017

शाहू छत्रपतींचे दुर्मिळ छायाचित्र : महाराजांना मुजरा


10 नोवेंबर 1917 चा तो ऐतिहासिक दिवस.
दिल्ली..मराठ्यांचा जरीपटका या भारताच्या राजधानीवर ज्या शाहू छत्रपतींनी फडकावला,तेच नाव धारण करुन समाजात आपल्या विचारांची पताका मोठ्या डौलाने बांधनाऱ्या राजर्षी शाहू छात्रपतींनी त्याच दिल्लीमधे एक महत्वाची घोषणा केली..
"युगप्रवर्तक छत्रपती शिवराय यांचे तितक्याच ताकदीचे भव्य स्मारक उभा करायचे.."
पुढे,19 नोवेंबर 1921 त्या स्मारकाची पायाभरणी करन्यात आली.
जेव्हा पुण्यामधे या स्मारकाच्या पायाभरणीचा समारंभ प्रिंस ऑफ़ वेल्स याच्या हस्ते पार पडला,त्यावेळेस जमलेल्या जनसमुदायाला शाहू महाराजांनी मार्गदर्शन केले..
त्यावेळेस काढण्यात आलेला हा फोटो..
आजवर कुठल्याही ठिकाणी न प्रकाशित झालेला हा फोटो आपल्याला 'करवीर रियासत' यांच्यामुळे प्रदर्शित करण्यास मिळाला..
डाव्या बाजूला प्रिन्स ऑफ़ वेल्स दिसत आहे आणि उजव्या बाजूला राजर्षी शाहू छत्रपती..
या द्रष्टया छत्रपतीची आज जयंती..त्यनिमित्ताने काहीसे अपरिचीत..!!
फोटो साभार : करवीर रियासत
केतन पुरी.

No comments:

Post a Comment