शाहू छत्रपतींचे दुर्मिळ छायाचित्र : महाराजांना मुजरा
10 नोवेंबर 1917 चा तो ऐतिहासिक दिवस.
दिल्ली..मराठ्यांचा जरीपटका या भारताच्या राजधानीवर ज्या शाहू छत्रपतींनी
फडकावला,तेच नाव धारण करुन समाजात आपल्या विचारांची पताका मोठ्या डौलाने
बांधनाऱ्या राजर्षी शाहू छात्रपतींनी त्याच दिल्लीमधे एक महत्वाची घोषणा
केली..
"युगप्रवर्तक छत्रपती शिवराय यांचे तितक्याच ताकदीचे भव्य स्मारक उभा करायचे.."
पुढे,19 नोवेंबर 1921 त्या स्मारकाची पायाभरणी करन्यात आली.
जेव्हा पुण्यामधे या स्मारकाच्या पायाभरणीचा समारंभ प्रिंस ऑफ़ वेल्स
याच्या हस्ते पार पडला,त्यावेळेस जमलेल्या जनसमुदायाला शाहू महाराजांनी
मार्गदर्शन केले..
त्यावेळेस काढण्यात आलेला हा फोटो..
आजवर कुठल्याही ठिकाणी न प्रकाशित झालेला हा फोटो आपल्याला 'करवीर रियासत' यांच्यामुळे प्रदर्शित करण्यास मिळाला..
डाव्या बाजूला प्रिन्स ऑफ़ वेल्स दिसत आहे आणि उजव्या बाजूला राजर्षी शाहू छत्रपती..
या द्रष्टया छत्रपतीची आज जयंती..त्यनिमित्ताने काहीसे अपरिचीत..!!
फोटो साभार : करवीर रियासत
केतन पुरी.
Tuesday, 27 June 2017
८२ देशांचा राजा शिवरायांना अभिवादन करताना !
८२ देशांचा राजा शिवरायांना अभिवादन करताना !
#राजर्षी_शाहू
नोव्हेंबर १९, १९२१ साली ''शिवाजी कि जय , शाहू कि जय " च्या गजरात, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत ८२ देशांचा सर्वेसर्वा असलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स ने छत्रपती शिवरायांना अभिवादन करत भारतातल्या पहिल्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन केले.

प्रिन्स ऑफ वेल्स ने शिवरायांचा उल्लेख "Shivaji not only founded an
Empire, but created a Nation." अश्या गौरवपूर्ण शब्दात केला त्याला
उत्तरादाखल राजश्री शाहू म्हणाले "हे घडू शकले कारण,मराठे हे जन्मापासूनच
लढवय्ये असतात "
१० नोव्हेंबर १९१७ रोजी राजर्षी शाहू महाराजांनी दिल्लीत शिवाजी स्मारकाची घोषणा केली आणि नोव्हेंबर १९, १९२१ साली स्मारकाचे भूमिपूजन झाले. दुर्दैवाने मे १९२२ साली राजर्षी शाहूंचे निधन झाले परंतु त्यांचे स्वप्न महाराजा माधवराव शिंदे (मृत्यू १९२५) आणि त्यांच्यानंतर गादीवर आलेले छत्रपती राजाराम आणि पुतळ्याच्या उभारणीस झटणारे ५०० कामगार यांनी पूर्ण केले ,
४,६५,००० रुपये खर्चून उभा राहिलेल्या या भव्य पुतळ्याचे १६ जून १९२८ रोजी अनावरण झाले.
राजर्षी शाहूंच्या स्वप्नातून उभा राहिलेला हा शिवरायांचा भव्य पुतळा आजही पाहताना नकळतच शाहुराजांना नमन करायला मान खाली झुकते !
Malojirao Jagdale sir

Subscribe to:
Posts (Atom)