Thursday, 21 April 2016

छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांनी केले शाक्त धर्मांतर :- एक संशोधन

ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अधिकृत रयतेचे राजा झाले. त्या दिवसाला महाराष्ट्रात एक आगळे-वेगळे महत्त्व आहे. ६ जून १६७४ रोजी किल्ले  रायगड येथे शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक संपन्न झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी "शुद्र पूर्वी कोण होते" हा ग्रंथ ओबीसी-कुणबी-मराठा या वर्गासाठी लिहिलेला आहे. याच पुस्तकात बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांविषयी अतिशय संशोधनात्मक स्वरुपात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सखोल संशोधन केलेलं आहे. ज्या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला, तेव्हापासून शिवरायांनी नवीन शक सुरु केले. त्याला "राज्याभिषेक शक" म्हणून ओळखले जाते. पण हे शक फार काळ टिकू शकले नाही. जोपर्यत शिवशाहीचे राज्य होते तोपर्यंतच हे शक पाळले गेले. शिवशाहीचा अस्त होऊन जेव्हा ब्राम्हण-पेशव्यांच्या हातात सत्ता आली. तेव्हा पेशव्यांनी असा हुकुम जाहिर केला की…"शिवशक बंद करून मोगल बादशहाचे फसली शक सरू करावे"

६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक "वैदिक" पद्धतीत संपन्न झाला. पण असे करतांना काशीच्या गागाभट्ट या वैदिक-ब्राम्हण पुरोहिताने राज्याभिषेकात "वेदोक्त मंत्रपठण" न करता "पुराणोक्त मंत्र" पठन करून शिवरायांना "क्षत्रिय" मानण्यास नकार दिला. व शिवरायांना "शुद्र" घोषित केले गेले. या सर्व अपमानास्पद वागणुकीनंतर शिवरायांनी या छळाचा बदला घेण्याचे ठरविले. त्यानुसार शिवबांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी रायगड येथे दुसरा राज्याभिषेक "अवैदिक-शाक्त" पद्धतीत साजरा केला. ६ जून १६७४ ते २४ सप्टेंबर १६७४ या काळात शिवाजी महाराज कधीच राजसिंहासनावर बसले नाहीत. त्यांनी सर्व वैदिक परंपरा नाकारल्या.

वैदिक-ब्राम्हणी धर्माच्या विषमतावादी तत्त्वज्ञाला विरोध करण्यासाठी शिवरायांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली. शिवाजी महाराजांच्या अगोदर संभाजी महाराजांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली होती. कारण संभाजी महाराजांचे सासरे पिलाजी शिर्के हे शाक्त-धर्माचे होते. पिलाजी शिर्के मुळचे शृंगारपुरचे निवासी होते. संभाजी महाराजांनी आवैदिक-शाक्त धर्माचा अभ्यास करण्यासाठी शिवरायांनी त्यांना शृंगारपुर येथे ठेवले होते. शृंगारपुर हे शाक्तांचे एक प्रभावी केंद्र होते. शाक्त तत्वज्ञानी "शिवयोगी" यांनी शृंगारपुरला शाक्त-धर्मपीठ स्थापन करून शाक्त धर्माच्या प्रचारास सुरुवात केली. संभाजी राजांचा विरोध करणारे प्रामुख्याने वैदिक-ब्राम्हण होते. त्यामुळे त्यांचा बिमोड करणे संभाजीराजांचे पहिले कर्तव्य होते.

शिवकालीन वज्रयान गुह्य समाज (गुप्त समाज) या बौद्ध तंत्र संप्रदायातून विकसित झालेल्या शाक्त-धर्माची शिवरायांनी दिक्षा घेतली. या धर्मानुसार 
शाक्त-दिक्षा घेतल्यावर अस्पृश्य स्त्रीशी शैव-विवाह शिवरायांनी केला होता. पहिले शिवचरित्रकार कृ.अ. केळुसकर गुरुजींनी पृ. ४१०-११ च्या तळटिपेत या विषयी लिहिले आहे.                                                                      

संदर्भ :-   शुद्र पूर्वी कोण होते ->  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
               शिवरायांचे खरे शत्रू महंमदी की ब्राम्हणी :-> कॉ. शरद पाटील
               शिवचरित्र :-> कृ.अ. केळुसकर गुरुजी         

Friday, 1 April 2016

मराठी काव्य अनुवाद

जय जिजाऊ,
छत्रपती संभाजीराजे लिखित "बुधभूषण "या संस्कृत ग्रंथाचा मराठी काव्य अनुवाद इतिहासात पहिल्यांदाच मला करता आला याचा सार्थ अभिमान वाटतो, शिवमती. शैलजाताई ज्ञानेश्वर मोळक यांनी संपादक म्हणून अथक परिश्रमाद्वारे" बुधभूषण "ग्रंथ आपल्याला इतिहासात पहिल्यांदाच आणून अद्वितीय, महनीय शिवकार्य केले त्यास तोड नाही. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर ताकवले सरांनी "बुधभूषण "हा ग्रंथ संस्कृत मधून अतिशय प्रभावी पध्दतीने मराठीत अनुवाद केला, हया एैतिहासिक ग्रंथातील निवडक कौवणांचा मराठी काव्य अनुवाद करता आला ते केवळ सदर ग्रंथ संपादक शैलजाताई ज्ञानेश्वर मोळक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर ताकवले सरांनी अनुवाद केल्यामुळेच मला "बुधभूषण " ग्रंथाचा मराठी काव्य अनुवाद करता आला हे विनम्र पणे कबूल करतो,शैलजाताई ज्ञानेश्वर मोळक व डॉ. प्रभाकर ताकवले सरांना लाख लाख घन्यवाद देतो",बुधभूषण "हा मराठी काव्य अनुवाद केलेला ग्रंथ लवकरच आपल्या भेटीस येत आहे.
बुधभूषण
शरद गोरे
मराठी काव्य अनुवाद
९९२२९८६३८६