Sunday, 15 May 2016

स्वराज्याचे हिरे व किल्ले

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र  १२ मावळे घेतल्याशिवाय तसेच वेल्हे येथिल प्रचंडगड म्हणजे आजचा तोरणागड तसेच रायरेश्वर येथिल शपथ घेतल्याशिवाय पुर्ण होऊ शकत  नाही. प्रथम नेताजी पालकर,वीर बाजी पासलकर , झुजांरराव मरळ,येसाजी कंक,कानोजी जेधे,येसाजी कामठे ……… क्रमश:






"संभाजी राजे यांची चित्रमय संघर्ष गाथा " शूर-पराक्रमी-विचारवंत-शिलवंत-न्यायी-लेखक-साहित्यिक अशा संभाजी राजे यांची हत्या

"संभाजी राजे यांची चित्रमय संघर्ष गाथा " शूर-पराक्रमी-विचारवंत-शिलवंत-न्यायी-लेखक-साहित्यिक अशा संभाजी राजे यांची हत्या …… 

 संभाजी राजे यांचा  इतिहास प्रत्येक मानवधर्माला न्याय देणारा  इतिहास आहे.शूर-पराक्रमी-विचारवंत-शिलवंत-न्यायी-लेखक-साहित्यिक असे राजे होते.  शहाजी राजे यांचा नातू माता जिजाऊ यांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज यांचा शूर पुत्र असे त्यांचे कर्तृत्व होते. भट बामनांचा कर्दनकाळ होते संभाजी राजे सर्वात प्रथम शाक्त धर्माची दीक्षा त्यांनी घेतली होती. जिजाऊ प्रकाशन लेखक चंद्रशेखर शिखरे लिखीत "संभाजी राजे यांची चित्रमय संघर्ष गाथा "
 क्रमश:
राजेश खडके

"संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांची हत्या..........


"संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांची हत्या....भाग १ }

जिजाऊ प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले लेखक चंद्रशेखर शिखरे यांचे "संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " हे चित्रमय पुस्तक वाचले. हे पुस्तक वाचत असताना मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची अनमोल अशी माहिती मला मिळाली. मानवा प्रती संताची भूमिका भावना याचे दर्शन झाले. त्यामधिल चित्राच्या माध्यमातून एक बोलक्या प्रतिक्रिया अनुभवयाला मिळत होत्या.भारतातील जैन- बौध्द धर्माची माहिती मिळाली. भारत हा स्त्री प्रधान देश होता याची माहिती मिळाली. परंतु भट बामनांचा इतिहास वाचत असताना मन हेलाऊन गेले हे भट बामन इतके क्रुर होते याचे दर्शन या लेखकाने केले आहे. अंगावर तर शहारे आलेच पण या भट बामनांचा रागही तेवढा आला आहे. कारण या पुस्तकात असे लिहिले आहे की,रायगडावर छत्रपती शिवरायांची हत्या याच भट बामनांनी केली आहे. कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचे अंत्य दर्शन या बहुजन समाजाला होऊ दिले नाही आपल्या पोटचा मुलगा युवराज संभाजी राजे भोसले यांना होऊ दिले नाही. त्यांचा अत्यंविधी न करता त्यांना भडाग्नी देऊन त्यांचा देह मातीत याच भट बामनांनी विलीन केला आहे. अशा इतिहासाची माहिती "संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " या पुस्तकाने दिली आहे. क्रमश:


भाग २ } 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंसंस्कार भट बामानानी होऊ दिला नाही याचे कारण काय ? असाही प्रश्न मला हे पुस्तक वाचताना पडला त्याचे उत्तर मला या "संभाजी राजे यांची संघर्ष गाथा " ह्या पुस्तकामध्ये आढळुन आला नाही. नेमके छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंसंस्कार जर झाला असता तर तो कोणत्या संस्कारा प्रमाणे किंवा धर्माप्रमाणे झाला असता याचे उत्तर या पुस्तकाचे लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी द्यावे असे या प्रतिक्रियाव्दारे मी त्यांना निवेदन करीत आहे. कारण धर्मा शिवाय कोणता राजा नाही संस्कारा शिवाय कोणते कुटुंब नाही. मला या पुस्तका नुसार जे आकलन झाले आहे ते असे की त्याकाळी हिंदु नावाचा कोणाताही धर्म नव्हता त्याकाळी जैन बौध्द मुस्लिम आणि ख्रिश्चन तसेच शीख पंथ होता शाक्त नावाचा पंथ किंवा धर्म होता का नाही आणि याचे धर्म असे विश्लेषण करता येईल काय ? असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित झाला आहे याचे उत्तर लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी दिले पाहिजे. हे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी त्यांनी दहा वर्षाची मेहनत घेतली आहे. तसेच भट बामनांचा त्याकाळी वैदिक धर्म होता असे म्हटले जाते हे जरी सत्य असले तरी एक सत्य मला उलगडले नाही त्या काळाची जनता कोणत्या धर्माचे आचरण करत होती हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. संशोधक आणि इतिहासकार याचे काय विश्लेषण करतात हे आजच्या तरुणांना माहित हवे. क्रमश: 

भाग ३ }

या पुस्तकात लेखक असे म्हणतो की छत्रपती शिवरायांनी पहिला राज्याभिषेक वैदिक पद्धतीत रायगड याठिकाणी ६ जून १६७४ मध्ये माता जिजाऊ यांच्या साक्षीने केला. मात्र हा राज्याभिषेक झाल्या नंतर लगेचच १२ दिवसांनी माता जिजाऊ यांचे निधन झाले त्यानंतर महाराज अस्ताव्यस्त झाले. काही लोकांनी त्यांना वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक मानवीला नसल्याचे सांगितले. त्यामुळे महाराजांनी गुप्त पद्धतीत दुसरा राज्याभिषेक २० सप्टेंबर १६७४ रोजी शाक्त धर्मा प्रमाणे गोसावी यांच्या हस्ते तांत्रिक पध्दती मध्ये केला असे लेखकांने म्हटले आहे. परंतु असे कोठेही महापुरुषांनी किंवा इतिहासकारांनी किंवा संशोधक यांनी म्हटल्याचे मला कोठेही सापडलेले नाही. कारण माता जिजाऊनी महाराजांना अंधश्रध्देकडे वळविले नव्हते त्यामुळे महाराजांनी तांत्रिक पद्धतीत तो राज्यभिषेक केलेला नाही असे स्वराज्य प्रेमी शिवपाईक म्हणुन वाटते. सदरच्या पुस्तकामध्ये लेखक असे म्हणतो की शिवरायांनी शाक्त पद्धतीचा राज्यभिषेक गुप्तपणे केला होता. परंतु मला तसे वाटत नाही कारण छत्रपती शिवराय शूर धाडसी पराक्रमी जनतेचे राजे होते भीती नावाचा शब्दही त्यांच्या जवळ येत नव्हता मग नेमके या लेखकाला काय सांगायचे आहे असा प्रश्न माझ्या समोर उभा राहिलेला आहे. का सदरचा राज्याभिषेक धर्म लेखकाला वाचका पासुन लपवून ठेवायचा आहे. कारण शाक्त धर्माचे खरे विश्लेषण जो पर्यंत लेखक आपल्या समोर जो आणित तो पर्यंत सदरच्या प्रश्नाचे गुढ कायम राहील आणि आपल्या सर्वांचा संभ्रम कायम राहील. क्रमश:

भाग ४ } 


परंतु सदर पुस्तकाचे वाचन केल्यानंतर काही ठिकाणी शाक्त धर्माचे पुरावे मला सापडले ते मी याठिकाणी देत आहे. "संभाजी राजे यांची चित्रमय संघर्ष गाथा"जिजाऊ प्रकाशन लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी जरी त्यांच्या या पुस्तकात शाक्त धर्माचे खरे विश्लेषण केले नसले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक "शुद्र पूर्वी कोण होते" तसेच कृ.अ. केळुसकर गुरुजी यांनी लिहिलेले "शिवचरित्र" हे पुस्तक आणि कॉ. शरद पाटील यांनी लिहिलेल्या "शिवरायांचे खरे शत्रू महंमदी की ब्राम्हणी" या पुस्तकात शाक्त धर्माचे खालील प्रमाणे विश्लेषण केले आहे.
दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अधिकृत रयतेचे राजा झाले. त्या दिवसाला महाराष्ट्रात एक आगळे-वेगळे महत्त्व आहे. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगड येथे शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक संपन्न झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी "शुद्र पूर्वी कोण होते" हा ग्रंथ ओबीसी-कुणबी-मराठा या वर्गासाठी लिहिलेला आहे. याच पुस्तकात बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांविषयी अतिशय संशोधनात्मक स्वरुपात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सखोल संशोधन केलेलं आहे. ज्या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला, तेव्हापासून शिवरायांनी नवीन शक सुरु केले. त्याला "राज्याभिषेक शक" म्हणून ओळखले जाते. पण हे शक फार काळ टिकू शकले नाही. जोपर्यत शिवशाहीचे राज्य होते तोपर्यंतच हे शक पाळले गेले. शिवशाहीचा अस्त होऊन जेव्हा ब्राम्हण-पेशव्यांच्या हातात सत्ता आली. तेव्हा पेशव्यांनी असा हुकुम जाहिर केला की…"शिवशक बंद करून मोगल बादशहाचे फसली शक सरू करावे"
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक "वैदिक" पद्धतीत संपन्न झाला. पण असे करतांना काशीच्या गागाभट्ट या वैदिक-ब्राम्हण पुरोहिताने राज्याभिषेकात "वेदोक्त मंत्रपठण" न करता "पुराणोक्त मंत्र" पठन करून शिवरायांना "क्षत्रिय" मानण्यास नकार दिला. व शिवरायांना "शुद्र" घोषित केले गेले. या सर्व अपमानास्पद वागणुकीनंतर शिवरायांनी या छळाचा बदला घेण्याचे ठरविले. त्यानुसार शिवबांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी रायगड येथे दुसरा राज्याभिषेक "अवैदिक-शाक्त" पद्धतीत साजरा केला. ६ जून १६७४ ते २४ सप्टेंबर १६७४ या काळात शिवाजी महाराज कधीच राजसिंहासनावर बसले नाहीत. त्यांनी सर्व वैदिक परंपरा नाकारल्या.
वैदिक-ब्राम्हणी धर्माच्या विषमतावादी तत्त्वज्ञाला विरोध करण्यासाठी शिवरायांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली. शिवाजी महाराजांच्या अगोदर संभाजी महाराजांनी शाक्त धर्माची दिक्षा घेतली होती. कारण संभाजी महाराजांचे सासरे पिलाजी शिर्के हे शाक्त-धर्माचे होते. पिलाजी शिर्के मुळचे शृंगारपुरचे निवासी होते. संभाजी महाराजांनी आवैदिक-शाक्त धर्माचा अभ्यास करण्यासाठी शिवरायांनी त्यांना शृंगारपुर येथे ठेवले होते. शृंगारपुर हे शाक्तांचे एक प्रभावी केंद्र होते. शाक्त तत्वज्ञानी "शिवयोगी" यांनी शृंगारपुरला शाक्त-धर्मपीठ स्थापन करून शाक्त धर्माच्या प्रचारास सुरुवात केली. संभाजी राजांचा विरोध करणारे प्रामुख्याने वैदिक-ब्राम्हण होते. त्यामुळे त्यांचा बिमोड करणे संभाजीराजांचे पहिले कर्तव्य होते.
शिवकालीन वज्रयान गुह्य समाज (गुप्त समाज) या बौद्ध तंत्र संप्रदायातून विकसित झालेल्या शाक्त-धर्माची शिवरायांनी दिक्षा घेतली. या धर्मानुसार शाक्त-दिक्षा घेतल्यावर अस्पृश्य स्त्रीशी शैव-विवाह शिवरायांनी केला होता. पहिले शिवचरित्रकार कृ.अ. केळुसकर गुरुजींनी पृ. ४१०-११ च्या तळटिपेत या विषयी लिहिले आहे.
संदर्भ :- शुद्र पूर्वी कोण होते -> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिवरायांचे खरे शत्रू महंमदी की ब्राम्हणी :-> कॉ. शरद पाटील
शिवचरित्र :-> कृ.अ. केळुसकर गुरुजी

भाग ५ }

छत्रपती शिवरायांनी वैदिक धर्म पध्दतीत केलेला रायगडा वरील राज्याभिषेक नाकारला होता आणि शाक्त पध्दतीमध्ये दुसरा राज्याभिषेक करून घेतला होता. याचाच राग भट बामनांना आला होता आणि त्यामुळेच नियोजित पध्दतीत त्यांनी  छत्रपती शिवरायांची हत्या केली.या पुस्तकाचे वाचन केले आणि त्यातील चित्र पाहिले तर हे लक्षात येते लेखकाने हे चित्रमय पुस्तक खूप हिमतीने लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मन अत्यंत हेलावून जाते  या भट बामनांचे हे क्रुर कृत्य वाचून यातील चित्रमय गाथा वाचल्या नंतर मनाला खुप दु:ख होते. भट बामनांचा खूप खूप राग येतो. परंतु त्याहूनही जास्त असा राग येतो की,आजही ही भट बामन माता जिजाऊ, संभाजी राजे आणि  कुंभी नी स्त्रीची बदनामी बदनामी करणारे भट बामन यांना पुरस्कार दिला जातोय. क्रमश:
राजेश खडके